नवेगावबांध : आदिवासी समाज हा समतावादी समाज असून, स्वअस्तित्वावर विश्वास ठेवणारा आहे. परंतु ज्यावेळी परंपरागत स्वातंत्र्यावर आघात झाला, परंपरागत जीवनपद्धती नष्ट होण्याची वेळ आली. त्या त्या वेळी आदिवासींनी सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न हाणून पाडले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ११ एप्रिल १८५८ रोजी आंबापाणीच्या लढाईत अटक झालेल्या ५७ भिल्ल बहाद्दूरांनी डोक्यावर बंदुकीच्या गोळ्या झेलून स्वातंत्र्यासाठी बलिदानाचा पहिला मान घेतला. यावेळी ४०० स्त्रियांना अटक झाली होती. आदिवासींचा इतिहास हा पराक्रमाचा इतिहास आहे. असे प्रतिपादन पवनी धाबे पोलीस सशस्त्र दूर क्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण हारगुळे यांनी केले.
आदिवासी स्मारक समिती पवनीधाबेच्या वतीने जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष कुसन इस्कापे हे होते. यावेळी सरपंच पपीता नंदेश्वर, उपसरपंच पराग कापगते, धाबेपवनी सशस्त्र दूर पोलीस केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण हारगुळे, राजेंद्र पानसरे, गजानन वैद्य, बाबूराव काटेंगे, यशवंत कुंभरे, शिवाजी कमरो, मारोती गावळ, तंटामुक्ती अध्यक्ष कैलास नंदेश्वर प्रेमलाल गेडाम उपस्थित होते. जल जंगल जमीन यांना माय समजणाऱ्या डोंगर पहाडात वास्तव्य करणाऱ्या आदिवासी समाजाचे पर्यावरण रक्षणात मोलाचे योगदान असून, आदिवासी समाज समाजाच्या मुख्य प्रवाहात येत असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले.
......
सप्तरंगी ध्वजाचे ध्वजारोहण
क्रांतिसूर्य बिरसा मुंडा सेवा समिती नवेगावबांधच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त बिरसा मुंडा यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी सैनिक नीलमचंद्र पंधरे यांच्या हस्ते सप्तरंगी ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी समितीचे अध्यक्ष तुळशीदास कुंभरे, सतीश कुंभरे ग्रामपंचायत सदस्य, होमराज कोरेटी माजी पंचायत समिती सदस्य गुलाब परतेकी, लालाजी भोयर, नेवालाल उईके, मोरेश्वर चनाप, शालिकराम गावड, नारायण मरस्कोल्हे, कालिदास कन्नाके उपस्थित होते.