अर्जुनी मोरगाव : स्वार्थाच्या राजकारणासाठी ओबीसींच्या आरक्षणावर वार करीत स्थानिक स्वराज्य संस्थांमधून ओबीसींना डावलण्याचा कुटिल डाव रचला. दीड वर्षापासून शेतकरी ७०० रुपये बोनससाठी प्रतीक्षा करीत आहेत. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन मदतीच्या घोषणेचा विसर पडला. तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींचे विजेचे कनेक्शन खंडित करून जनतेला पावसाच्या दिवसात काळोखात ठेवण्याचे महापाप करीत त्रिकुट सरकारने जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप भाजपाचे तालुका अध्यक्ष अरविंद शिवणकर यांनी केला. भाजपच्या वतीने स्थानिक महाराणा प्रताप चौकात शनिवारी (दि.२६) आघाडी सरकारच्या निषेधार्थ चक्काजाम आंदोलनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य रचना गहाणे, जि. प.चे माजी बांधकाम सभापती प्रकाश गहाणे, लायकराम भेंडारकर, उमाकांत ढेंगे, डॉ. गजानन डोंगरवार, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष किरण कांबळे, नामदेव कापगते, रघुनाथ लांजेवार, केवळराम पुस्तोडे, देवेंद्र टेंभरे, प्रमोद पाऊलझगडे, वर्षा घोरमोडे, विजय कापगते, गिरीश बागडे, भोजराज लोगडे उपस्थित होते.
===Photopath===
260621\img-20210626-wa0002.jpg
===Caption===
महाराणा प्रताप चौकात चक्काजाम आंदोलन करतांना भाजप कार्यकर्ते