शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
2
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
3
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
4
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
5
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
6
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
7
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
9
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
17
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
19
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

माविमच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:13 AM

महिला आर्थिक विकास महामंडळ बचतगटाच्या माध्यमातून महिलांना विकासाच्या प्रवाहात आणत आहे. महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न देखील करीत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.

ठळक मुद्देराजकुमार बडोले यांचे प्रतिपादन : माविमचा स्थापना दिवस साजरा

आॅनलाईन लोकमतगोंदिया : महिला आर्थिक विकास महामंडळ बचतगटाच्या माध्यमातून महिलांना विकासाच्या प्रवाहात आणत आहे. महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न देखील करीत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.२४ फेब्रुवारी रोजी गोंदिया येथे आयोजित महिला आर्थिक विकास महामंडळाच्या ४३ व्या वर्धापन दिन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी आ. गोपालदास अग्रवाल, नाबार्डचे सहायक महाप्रबंधक निरज जागरे, आयसीआय बँकेचे विभागीय व्यवस्थापक अमोल राजिगरे, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सविता बेदरकर उपस्थित होत्या.पालकमंत्री बडोले म्हणाले, जिल्ह्यात ५०४३ बचतगट असून महिला आर्थिक विकास महामंडळ बचतगटाच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर करुन त्यांना सक्षम करण्याचे चांगले काम करीत आहे. आजच्या काळात मार्केटिंग बदललेली आहे.त्यामुळे बाजारपेठेची सांगड घालणे अत्यंत गरजेचे आहे. महिला बचतगटाने उत्पादीत केलेल्या वस्तूला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यास आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. अग्रवाल म्हणाले, महिला सक्षमीकरण चळवळीला पुढे नेण्याचे काम माविमच्या माध्यमातून होत असून यात ६२ हजार ४८६ महिलांचा सहभाग आहे. बचतगटाच्या माध्यमातून महिलांनी उत्पादीत केलेल्या वस्तुला विक्री केंद्रासाठी एक चांगला मॉल तयार करण्याच्या दृष्टीने माविमची स्वतंत्र इमारत तयार व्हावी. यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.प्रास्ताविकातून सुनील सोसे म्हणाले, आंतरराष्ट्रीय महिला वर्षाच्या निमित्ताने २४ फेब्रुवारी १९७५ मध्ये महिला आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. त्यानुसार महिलांचे सक्षमीकरण करणे, महिलांचा विकास करणे, महिलांमध्ये आत्मविश्वास वाढविणे व महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम माविमच्या माध्यमातून करण्यात येत आहे असे सांगितले.यावेळी महिला बचत गटाच्या कार्याची व्यापक प्रचार-प्रसार केल्याबद्दल लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी अंकुश गुंडावार यांचा, महिला बचतगटाच्या कार्याची इलेक्ट्रानिक मीडियाच्या माध्यमातून दखल घेणारे हरिष मोटघरे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.महिलांना आपल्या प्रबोधनाच्या माध्यमातून प्रोत्साहीत केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सविता बेदरकर यांचा, महिला बचतगटाच्या सक्षमीकरणात नाबार्डच्या सहभागाबाबत नाबार्डचे सहायक महाप्रबंधक निरज जागरे, महिला बचतगटाच्या बळकटीकरणात बँकेच्या आर्थिक सहभागाबद्दल आयसीआय बँकेचे विभागीय व्यवस्थापक अमोल राजिगरे, उत्कर्ष लोकसंचालीत साधन केंद्र गोंदिया, स्वावलंबन लोकसंचालीत साधन केंद्र आमगाव, सहारा लोकसंचालीत साधन केंद्र सालेकसा यांचा सत्कार करण्यात आला.चित्रकला स्पर्धेत नलू मेहर (प्रथम), अस्मीता भैसारे (द्वितीय), एल.डी.बांगरे (तृतीय) पुरस्कार, यशोगाथा स्पर्धेत भारती लांजेवार (प्रथम), सहारा सीएमआरसी सालेकसा (द्वितीय), तेजस्वीनी येरपुडे (तृतीय) यांना पुरस्कार, गीत गायन स्पर्धेत मनोज बोरकर तिरोडा (प्रथम), कल्पना नंदेश्वर सडक/अर्जुनी (द्वितीय), नंदेश्वरी बिसेन तिरोडा (तृतीय) यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देवून गौरव करण्यात आला.यावेळी पालकमंत्री बडोले यांनी चित्रकला स्पर्धा व यशोगाथा स्पर्धेचे अवलोकन केले. याप्रसंगी माविमच्या महिलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करु न उपस्थितांची मने जिंकली.यशस्वीतेसाठी माविमचे सहायक जिल्हा समन्वय अधिकारी सतीश मार्कंड, सनियंत्रण अधिकारी प्रदीप कुकडकर, माविम कार्यालयातील प्रफुल अवघड, एकांत वरघने व महिला बचतगटाच्या सहयोगिनी यांनी सहकार्य केले. प्रास्ताविक व आभार माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुािील सोसे यांनी मानले. कार्यक्रमास माविमच्या महिलांची मोठ्या संख्येत उपस्थिती होत्या.