शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
2
"ना शिवरायांनी सांगितलं, ना बाबासाहेबांनी सांगितलं, हे अत्ता सुरू झालं, कारण..."; 'संत' म्हणत राज यांचा पवारांवर हल्लाबोल
3
"माझा राजकीय अस्त करण्याची व्यूहरचना"; पंकजा मुंडेंच्या पराभवाचा उल्लेख, धनंजय मुंडे काय बोलले?
4
मंगलदेशा, पवित्रदेशा, नातेवाइकांच्याही देशा..., कुटुंबकबिल्याच्या विळख्यात महाराष्ट्राचं राजकारण
5
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
6
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
7
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
8
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
9
हसवता हसवता डोळ्यात पाणी आणणारी कहाणी! अभिषेक बच्चनच्या I want to Talk चा भावुक ट्रेलर
10
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
11
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
12
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
13
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
14
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
15
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
17
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
18
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
19
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
20
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू

देशातील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न

By admin | Published: June 28, 2014 11:37 PM

देशातील न्यायालयांवर मोठ्या संख्येत प्रलंबीत प्रकरणांचे ओझे आहे. हे प्रलंबीत प्रकरण निकाली काढण्यासाठी जलदगतीने कार्य सुरू आहे. नागरिकांना जलद न्याय मिळवून देण्यासाठी

बी.आर. गवई : आमगाव व सालेकसा येथे नवीन न्यायालय इमारतीचे उद्घाटनआमगाव/सालेकसा : देशातील न्यायालयांवर मोठ्या संख्येत प्रलंबीत प्रकरणांचे ओझे आहे. हे प्रलंबीत प्रकरण निकाली काढण्यासाठी जलदगतीने कार्य सुरू आहे. नागरिकांना जलद न्याय मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. यासाठी शासनाने ग्राम न्यायालय प्रारंभ केले आहे. प्रत्येकाला जलद वा कमी खर्चात न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे. देशातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय मिळवून देण्याचा सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश बी.आर. गवई यांनी केले. येथील दिवानी न्यायालयाच्या (क-स्तर) नवीन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी शनिवारी ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.जी. गिरटकर, आमगावचे दिवानी न्यायाधीश (क-स्तर) एम.बी. दुधे, सालेकसा न्यायालयाचे न्यायाधीश (क-स्तर) आर.के. पुरोहित, वकील संघाचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. वाय.एच. उपराडे व अन्य उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते सरस्वतीपूजन व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.जी. गिरटकर यांनी, नागरिकांना तत्परतेने न्याय मिळावे हा शासनाचा ध्येय आहे. याकरिता शासनाने ग्राम न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय प्रारंभ केले आहे. न्यायालयात अनेक प्रकरणे प्रलंबीत असून ते निकाली काढण्यासाठी न्याय व्यवस्था कार्यरत आहे. यात जलदगतीने १० हजार प्रकरणे निकाली काढण्यात आल्याचे सांगितले. तर जिल्ह्यात पूर्वी २३ न्यायाधीश प्रकरणांना तत्परतेने हाताळायचे यात आता फक्त १३ न्यायाधीश प्रकरणांना निकाली काढत असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत अ‍ॅड. उपराडे यांनी, न्यायालयाच्या मंजुरीसाठी येथील जनप्रतिनिधींनी विशेष प्रयत्न घेतल्याचे सांगत न्यायालयात न्यायासाठी येणाऱ्या अपंगासाठी विशेष सोय करण्यात आल्याची माहिती दिली. दरम्यान पाहुण्यांच्या हस्ते न्यायालयाच्या प्रशस्त इमारतीचे फित कापून विधीवत उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन अ‍ॅड. ओमप्रकाश मेठी यांनी केले. आभार न्यायाधीश दुधे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्रमात गावातील प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अ‍ॅड. प्रशांत तायडे, एच.आर. गुप्ता, एस.डी. बागळे, आर.डी. लिल्हारे, ए.एम. ब्राह्मणकर, नागपुरे, पी.पी. थेर, कठाणे, निखारे, अमर गुप्ता, मिथुन गुप्ता, शर्मा, साखरे यांनी सहकार्य केले. सालेकसा : येथील ग्राम न्यायालय महिन्यातुन चार दिवस चालणार आहे. प्रत्येक आठवड्याच्या सोमवारी येथील न्यायालयात न्यायालयीन निर्णय विकास प्रक्रिया चालणार असून यात समरी केसेस निकाली काढण्यात येतील. येथील न्यायाधिकारी म्हणून न्या. आर.के. पुरोहीत यांना पदस्थ करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या पुर्वी टोकावर असलेला सालेकसा तालुका हा गोंदिया जिल्ह्यात सर्वात जास्त मागासलेला व उपेक्षित तालुका असून अति संवेदनशील व नक्षलग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात गरीब आदिवासी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे लोक जास्त वास्तव्यास असून त्यांना न्यायालयीन विषयात मोठा पैसा व वेळ खर्च करावा लागत होता. अशात येथे न्यायालय आल्याने तालुकावासीयांत आनंदाचे वातावरण आहे. येथील कार्यक्रमाचे संचालन करून आभार सरकारी वकील अ‍ॅड. पुरुषोत्तम आगाशे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अ‍ॅड. उत्तम नागपुरे, अ‍ॅड. एम.एच. गुप्ता, विरेश दसरिया, अ‍ॅड. चौधरी तसेच पोलीस निरीक्षक देवीदास हांडोरे, राजू पाटील बापू पिंगळे, आदींनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी/प्रतिनिधी)