ऑनलाईन लोकमततिरोडा : येथील तिरोडा-तुमसर मार्गावरील सेंट्रल बँक आॅफ इंडियात चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी (दि.७) पहाटे ५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. बँकेची तिजोरी असलेल्या गेटचे लॉक न उघडल्याने व सायरन वाजल्याने चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला. दरम्यान या घटनेमुळे शहरवासीयांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.प्राप्त माहितीनुसार बुधवारी पहाटेच्या सुमारास फिरायला जात असलेल्या काही नागरिकांना येथील सेंट्रल बँकेचे गेट उघडे व कुलूप खाली तुटून पडलेले दिसले. त्यांना बँकेत चोरी झाल्याचा संयश आल्याने त्यांनी लगेच तिरोडा पोलीस स्टेशनला फोन करुन या घटनेची माहिती दिली.त्यानंतर पोलीस आणि बँकेचे अधिकारी काही वेळातच बँकेत दाखल झाले. त्यांनी बँकेच्या आत प्रवेश करुन काही चोरीला गेले का याची पाहणी केली. दरम्यान चोरट्यांनी बँकेची तिजोरी असलेल्या गेटचे लॉक तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र लॉक न तुटल्याने व सुरक्षा विषयक लावलेले सायरन वाजल्याने चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला. दरम्यान चोरट्यांनी बँकेच्या गेटसमोर लागलेले सीसीटीव्ही कॅमेरा फोडून तो रस्त्यावर फेकला होता. तर बँकेतील सामानाची नासधूस केल्याची माहिती आहे. दरम्यान या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष तीन चार दिवसांपूर्वीच तिरोडा येथील एका न्यायाधिशांच्या घरी चोरी झाली. तर यापूर्वी सुध्दा येथे चोरीच्या घटना घडल्या आहेत. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे शहरवासीयांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बँकेचे व्यवस्थापक प्रेमनाथ रामटकेकर यांच्या तक्रारीवरुन तिरोडा पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुध्द भांदवीच्या कलम ४५७, ३८०, ५११ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.चोरटे सीसीटीव्हीत कैदसेंट्रल बँकेत चोरीचा प्रयत्न करणाºया चोरट्यांच्या सर्व हालचाली बँकेच्या आत लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयामध्ये कैद झाल्या आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीतील फुटेजवरुन चोरट्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे.सुरक्षा रक्षकाची नियुक्ती नाहीभंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे एटीएम फोडण्याच्या घटनेनंतर एटीएम आणि बँकेच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे आला होता. मात्र यानंतरही बँक व्यवस्थापनाने कसलाच धडा घेतलेला नाही. तिरोडा येथील सेंट्रल बँकेत चोरीच्या घटनेनंतर या बँकेत रात्रपाळीत सुरक्षा रक्षकाची नियुक्तीच करण्यात आली नसल्याची बाब पुढे आली आहे.
तिरोड्याच्या सेंट्रल बँकेत चोरीचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 11:43 PM
येथील तिरोडा-तुमसर मार्गावरील सेंट्रल बँक आॅफ इंडियात चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी (दि.७) पहाटे ५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. बँकेची तिजोरी असलेल्या गेटचे लॉक न उघडल्याने व सायरन वाजल्याने चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला.
ठळक मुद्दे सुरक्षा रक्षकाची नियुक्ती नाही : चोरीच्या घटनांमध्ये वाढ