लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : सन २०१७-१८ या वर्षात तुडतुडा रोगामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करताना तलाठी, कृषी सहायक व कोतवालांनी सर्वेक्षणात घोळ केला. पैसे घेऊन मर्जीतील शेतकऱ्यांचे नावे लाभार्थी यादीत टाकल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. त्यामुळे धाबेपवनी तलाठी साजा क्रमांक २७ मधील शेकडो शेतकरी शासकीय मदतीपासून वंचीत राहीले.सदर प्रकरण बँकेकडे आलेल्या लाभार्थी यादीवरुन वंचित शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. सर्वेक्षण करणाऱ्या तलाठी, कोतवाल, कृषी सहाय्यक यांची सखोल चौकशी करुन त्यांच्यावर कारवाही करण्याची मागणी येलोडी परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ.कांदबरी बलकवडे यांनी केलेल्या तक्रारीतून केला.सन २०१७-१८ मध्ये तुडतुडा या रोगाने धाबेपवनी तलाठी साझा क्रमांक २७ अंतर्गत येणाऱ्या रामपुरी, एलोडी, जांभळी, धाबेपवनी, तिडगा या गावातील धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल.या गावातील शेतकऱ्यांनी तुडतुड्याने झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण तलाठी, कृषी सहाय्यक, कोतवाल यांनी केले. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली. बँकेकडे लाभार्थी शेतकºयांची यादीही आली.परंतु सदर यादीत तुडतुड्याने नुकसान झालेल्या श्ोतकऱ्यांची नावे नव्हती. त्यामुळे येलोडी परिसरातील शेकडो शेतकरी मदतीपासून वंचित राहीले.सर्वेक्षण करताना तलाठी, कृषी सहाय्यक व कोतवाल यांनी पैशाची देवाण-घेवाण करुन मर्जीतील शेतकऱ्यांची नावे लाभार्थी यादीत टाकल्याने योग्य लाभार्थी मदतीपासून वंचित राहिल्याचा आरोप शेकडो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केलेल्या तक्रारीत केला आहे.ज्या शेतकºयांचे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांच्या शेतात जावून सर्वेक्षण करण्यात आले. यात कुठलाही घोळ झालेला नाही. तुडतुडा या रोगाने ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना आर्थिक मदत मिळावी कुणीही मदतीपासून वंचित राहू नये याची काळजी घेतली.-मिलिंदकुमार जांभूळकर, तलाठी, धाबेपवनी.
तलाठ्याने केला तुडतुडा सर्वेक्षणात घोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 1:06 AM
सन २०१७-१८ या वर्षात तुडतुडा रोगामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करताना तलाठी, कृषी सहायक व कोतवालांनी सर्वेक्षणात घोळ केला. पैसे घेऊन मर्जीतील शेतकऱ्यांचे नावे लाभार्थी यादीत टाकल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.
ठळक मुद्देएलोडी परिसरातील शेकडो शेतकरी मदतीपासून वंचित