शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

समाजोपयोगी उपक्रमांमुळे तंमुसला आली बळकटी

By admin | Published: February 06, 2017 12:47 AM

जेष्ठांना सन्मान, वाचनालयांचे उत्थान, कुपोणावर मात, हुंडाबंदीसाठी प्रयत्न, गावाचे विद्रुपीकरणासाठी पुढाकार, आंतरजातिय विवाहाला प्रोत्साहन,

तंटे सुटले सामोपचाराने : जातीय दंगलींना बसला आळा गोंदिया : जेष्ठांना सन्मान, वाचनालयांचे उत्थान, कुपोणावर मात, हुंडाबंदीसाठी प्रयत्न, गावाचे विद्रुपीकरणासाठी पुढाकार, आंतरजातिय विवाहाला प्रोत्साहन, समाजातील अनिष्ट रूढी परंपरा व क्रूर चालीरितींंचे उच्चाटण, थोर महापुरूषांच्या पुतळ्यांचे जतन, गावात एक गाव एक गणपतीची संकल्पना, दारूबंदीवर आळा घालण्यासाठी तंटामुक्त मोहीमेने प्रयत्न केले. समाजोपयोगी कार्यक्रमांमुळे तंटामुक्त मोहीमेला लोकचळवळीचा आधार मिळाला आहे. ज्या गावात अंतर्गत कलह होता तो संपुष्टात आला. जातीय दंगलीवर नियंत्रण आणण्याचे काम तंटामुक्त समित्यांनी केले. विद्यार्थ्यांनी वक्तृत्वातून ही मोहीम गाजविली. आज राज्यातील प्रत्येक नागरिकाला तंटामुक्तही तंटे सोडविण्यासाठी तंटामुक्त मोहीम महत्वाची कामगिरी बजावत आहे. गाव शांततेतून समृद्धीकडे जावे यासाठी राज्य शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम अंमलात आणली. या मोहीमेमुळे राज्यातील २० लाखावरील तंटे सामोपचाराने मिटविण्यात आले. या मोहिमेमुळे शासनाच्या कामात मदत करण्यासाठी गावगावात लोकचळवळ उभी झाली. राज्यातील तंटामुक्त गावे होण्याची प्रतिक्षा राज्यातील ८ हजार गावांना आहे. राज्यातील २७ हजार ग्राम पंचायतीपैकी १८ हजार ४२३ गावे साात वर्षात तंटामुक्त झालीत. सहा वर्षाच्या काळात राज्यातील चार जिल्हे तंटामुक्त झाले आहेत. यात गोंदिया जिल्हा राज्यातून तंटामुक्त होणारा जिल्हा आहे. गावागावातील तंटामुक्त गाव समित्यांनी दिवाणी, महसूली, फौजदारी व इतर स्वरूपाचे तंटे सोडवून नविन तंटे उद्भवणार नाही. याकडे लक्ष घालून समित्यांनी आपल्या गावाला शांततेतून समृध्दीकडे नेण्याचा माणस बांधला. अदखल स्वरूपाचे व काही फौजदारी प्रकरणेही तमुसने हाताळून गावात नवीन आदर्श उभा केला. (तालुका प्रतिनिधी)