लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडरच्या दरात दररोज होत असलेली दरवाढ बंद करा, यासह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने सोमवारी (दि.१) येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदारांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले.शासनाकडून पेट्रोल, डिझेल व एलपीजीची दररोज दरवाढ केली जात आहे. याचा निषेध करीत दररोज होणारी दरवाढ बंद करा, कर्जमाफी होऊन तालुक्यातील केवळ ४२ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले असल्याने उर्वरितांच्या खात्यावर त्वरीत पैसे जमा करा. शिष्यवृत्ती एससी, एसटी व ओबीसी विद्यार्थ्यांना त्वरीत द्या, तुडतुड्याचे पैसे सर्व शेतकºयांच्या खात्यावर जमा करा, शेंडा व मुंडीपार ३३ केव्ही पावर स्टेशन त्वरीत मंजूर करून काम सुरू करा, शेतकºयांच्या वीज बिलाची दरवाढ त्वरीत मागे घ्या व रेशनकार्ड त्वरीत देण्यात यावे या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने सोमवारी येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी व किसान सभेचे जिल्हाध्यक्ष मनोहर चंद्रिकापुरे, तालुकाध्यक्ष डॉ.अविनाश काशिवार, जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर, रमेश चुºहे, रजनी गिरेपूंजे, मिलन राऊत, दिनेश कोरे प्रामुख्याने उपस्थित होते.याप्रसंगी उपस्थितांनी दररोजच्या दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना शासनाचे यावर नियंत्रण नसल्याने रोष व्यक्त केला. दरम्यान, नायब तहसीलदार खोकले यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले.आंदोलनात मोठ्या संख्येत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
दररोजची इंधन दरवाढ बंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2018 12:55 AM
पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडरच्या दरात दररोज होत असलेली दरवाढ बंद करा, यासह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने सोमवारी (दि.१) येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी : तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन