शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
2
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
3
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
4
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
6
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
7
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
9
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
10
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
11
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
12
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
13
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
14
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
15
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
16
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
17
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
18
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
19
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
20
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो

शेतीपुरक व्यवसायाकडे वळा!

By admin | Published: February 22, 2017 12:22 AM

धानपीक उत्पादनाकडे अधिक न वळता दुग्ध व्यवसाय शेळीपालन, कुक्कुटपालन व सेंद्रीय भाजीपाला तयार

राजकुमार बडोले : कृषी व पशुसंवर्धन विभागांचा संयुक्त मेळावा परसवाडा : धानपीक उत्पादनाकडे अधिक न वळता दुग्ध व्यवसाय शेळीपालन, कुक्कुटपालन व सेंद्रीय भाजीपाला तयार करून जास्त उत्पादन घेऊन उद्योग करा. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल, असे मार्गदर्शन पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. दवनीवाडा येथे जि.प. कृषी विभाग व पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी प्रदर्शन, कृषी भुषण शेतीनिष्ठ सपत्नीक सत्कार, पशुपक्षी, शेळी, म्हैस, गाय व बैलजोडी मेळावा घेण्यात आला. त्यावेळी उद्घाटकीय भाषणातून ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत होते. ते पुढे म्हणाले, मुंबई व पुणे यासारख्या मोठ्या शहरात सेंद्रीय भाजीपाल्याची मोठी मागणी आहे. शेतकऱ्यांनी गाई, म्हशी, शेळी, कुक्कुटपालन हे केवळ घरापुरतेच मर्यादित न ठेवता त्याचा विस्तार करावा. मोठ्या प्रमाणात उद्योग करावे. दुग्धपदार्थ तयार करून मोठ्या बाजारात पाठवावे. त्यासाठी आपण मार्केटिंग व शेतीवर अवलंबून असणाऱ्या व्यवसायासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे ते म्हणाले. अधक्षस्थानी आ. विजय रहांगडाले होते. अतिथी म्हणून जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, कृषी व पशुसंवर्धन सभापती छाया दसरे, उपसभापती भक्तवर्ती, सरपंच लीना मस्करे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, डॉ. अनिल गजभिये, डॉ. राजेश वासनिक, कृषी विकास अधिकारी वंदना शिंदे, खंडविकास अधिकारी एस.व्ही. इस्कापे, पशुधन विभाग अधिकारी डॉ.पी.आर. सैयद, पं.स. सदस्य गुड्डू लिल्हारे, निता पटले, निलकंठ लांजेवार, संजू बैस परिसरातील सर्व सरपंच, गावकरी, नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. आ. विजय रहांगडाले यांनीही शेतकऱ्यांना दुध व अन्य व्यवसायाकडे वळून उद्योग करण्याचा सल्ला दिला. आपल्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता कमी पडू देणार नाही. २६ जानेवारीला वैनगंगेचे पाणी खळबंदा जलाशयात सोडण्यात आले असल्याचे सांगितले. दवनीवाडा तालुका बनावा यासाठी आपण प्रयत्नशील असून तसा पाठपुरावा पालकमंत्री यांच्याकडे करणार. स्वत: पालकमंत्री कार्यक्रमात असल्याने व्यासपीठावरून सर्व जाणीव आ. विजय रहांगडाले यांनी पालकमंत्री यांना करुन दिली. रस्ते, शाळा व जलशिवारयुक्त अंतर्गत कामे करण्याचे आश्वासन नागरिकांना दिले. सामाजिक कार्यकर्ते निलकंठ लांजेवार यांनीही तालुक्याची मागणी केली. डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, डॉ. राजेश वासनिक, डॉ. गजभिये, सभापती छाया दसरे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. राजेश वासनिक यांनी मांडले. संचालन डॉ. महेश राठोड यांनी केले. आभार कृषी अधिकारी वंदना शिंदे यांनी मानले. कार्यक्रमासाठी पं.स. सदस्य गुड्डू लिल्हारे, राजेश उरकुडे, सलीमभाई, लक्ष्मण मिश्रा, गंगासागर मंडेले, आत्माराम दसरे, माया जतपेले तसेच कृषी व पशुसंवर्धन विभागातील अधिकारी-कर्मचारी यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)