शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
3
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
4
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
5
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
7
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
8
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
9
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
10
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
11
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
12
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
13
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
14
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
15
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
16
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
17
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
18
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
19
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
20
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

२३ केंद्रावर १५३२ विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2022 5:00 AM

परीक्षेत मुख्य केंद्रासाठी मुख्य केंद्रचालक, उपकेंद्रावरील त्याच कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत प्राचार्य किंवा वरिष्ठ शिक्षक यांची उपकेंद्र प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. परीक्षेदरम्यान प्रश्नपत्रिका ताब्यात ठेवण्यासाठी अतिरिक्त केंद्रचालक म्हणून प्राथमिक पदवीधर शिक्षकांची मदत घेतली जाणार आहे.  तालुक्यातील प्राथमिक शाळांचे एकूण २७ पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापकांची अतिरिक्त केंद्रचालक म्हणून नियुक्ती केली आहे. 

विजय मानकरलोकमत न्यूज नेटवर्क सालेकसा : महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाच्या सूचनेनुसार शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे निकाल तयार करून परीक्षा मंडळाकडे पाठविले.  ज्याच्या आधारे २०२१ चे निकाल जाहीर करण्यात आले.  परंतु मार्च २०२२ मध्ये होणारी परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  बारावीच्या परीक्षा ४ मार्चपासून सुरू होणार आहेत.  परीक्षेबाबत तालुक्यातील सर्व परीक्षा केंद्रावर शिक्षण विभागाने परीक्षा मंडळाच्या सूचनेनुसार परीक्षेची तयारी पूर्ण केली आहे. परीक्षा मंडळाच्या निर्णयानुसार, जिथे ज्युनिअर कॉलेज आहे तिथे परीक्षा केंद्राचा निर्णय घेण्यात आला आहे.  ज्या कनिष्ठ महाविद्यालयात १५ पेक्षा कमी विद्यार्थी आहेत, त्या कनिष्ठ महाविद्यालयांसाठी जवळच्या केंद्र व उपकेंद्रात व्यवस्था करण्यात आली आहे.  या व्यवस्थेंतर्गत सालेकसा ज्युनिअर कॉलेज सालेकसा, जि.प. ज्युनिअर कॉलेज कावराबांध, पंचशील कनिष्ठ महाविद्यालय मक्काटोला, ग्रामविकास कनिष्ठ महाविद्यालय तिरखेडी, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय सोनपुरी, गुरुदेव कनिष्ठ महाविद्यालय दरेकसा  या सहा मुख्य परीक्षा केंद्रांव्यतिरिक्त १७ उप-केंद्रे स्थापन केली आहेत.  या सर्व केंद्रांवर ४ मार्चपासून १५३२ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत.  यासह यावेळी परीक्षेत मुख्य केंद्रासाठी मुख्य केंद्रचालक, उपकेंद्रावरील त्याच कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत प्राचार्य किंवा वरिष्ठ शिक्षक यांची उपकेंद्र प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.  परीक्षेदरम्यान प्रश्नपत्रिका ताब्यात ठेवण्यासाठी अतिरिक्त केंद्रचालक म्हणून प्राथमिक पदवीधर शिक्षकांची मदत घेतली जाणार आहे.  तालुक्यातील प्राथमिक शाळांचे एकूण २७ पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापकांची अतिरिक्त केंद्रचालक म्हणून नियुक्ती केली आहे. 

परीक्षा पद्धतीत बदल- यंदा परीक्षेत अनेक बदल करण्यात आले आहेत.  ज्यामध्ये १०० गुणांच्या पेपर आधी तीन तासाचा होता, तो आता ३.३० तासाचा आहे.  ४० गुणांच्या अडीच तासाच्या पेपरसाठी आता ३ तासाची वेळ ठेवण्यात आली आहे.  परीक्षार्थींना सकाळी १०.३० च्या पेपरसाठी एक तास आधी म्हणजे ९.३० वाजता हजर राहावे लागेल.  कोरोनाचा संसर्ग पाहता मास्क लावणे अनिवार्य आहे.  विद्यार्थ्यांचे तापमान आणि परीक्षा केंद्रांवर सॅनिटायझर तपासल्यानंतरच केंद्रावर प्रवेश दिला जाईल.असे मिळणार मानधन... - अतिरिक्त केंद्रचालकांना किलोमीटरनुसार मानधन देण्यात येणार आहे. शहरी भागात ३ कि.मी.पर्यंत रु. ६००, ३ ते ६ कि.मी.पर्यंत रु. ८००, ८ कि.मी.वर रु. १००० आणि ग्रामीण भागात ५००, ७००, ८०० आणि ९०० रु. मानधन दिले जाईल. बैठ्या पथकाला १०० विद्यार्थ्यांमागे रु. ३००, १०१ ते ६०० विद्यार्थ्यांमागे रु. ४००, ३०१ ते ६०० विद्यार्थ्यांना रु. ५००. आणि ६०० च्या वर रु. ६०० मानधन दिले जाईल. 

 

टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षा