शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

पर्यटन विकासाचे अडीच कोटी पडून

By admin | Published: February 09, 2017 12:59 AM

जिल्ह्यात अ आणि ब वर्गातील एकही पर्यटनस्थळ नाही. क वर्गातील १३ पर्यटनस्थळे असून सन २०१६-१७ या वर्षात विविध कामे करण्यासाठी

१० महिन्यांत ४६ लाखांची कामे : चार स्थळांवर तुरळक खर्च नरेश रहिले   गोंदिया जिल्ह्यात अ आणि ब वर्गातील एकही पर्यटनस्थळ नाही. क वर्गातील १३ पर्यटनस्थळे असून सन २०१६-१७ या वर्षात विविध कामे करण्यासाठी शासनाने ३ कोटी ३० लाख ८० हजार रूपये दिले आहेत. परंतु १० महिन्यांच्या काळात चार पर्यटनस्थळांच्या आठ कामांसाठी ७६ लाख ५९ हजारांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. परंतु त्यातील फक्त ४६ लाख ४९ हजार २९० रूपये खर्च करण्यात आले आहेत. या वर्षासाठी पर्यटनावर खर्च करण्यासाठी आलेल्या अडीच कोटी निधीचे नियोजनच नसल्याने आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिड महिन्यात पर्यटनावर उरलेले अडीच कोटी खर्च होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्ह्यातील १३ पर्यटनस्थळांमध्ये नवेगावबांध, नागरा, नागझिरा, प्रतापगड, ईटीयाडोह, ढासगड, शिरपूर धरण, कचारगड, मांडोदेवी, चूलबंद, बोदलकसा, चोरखमारा व पांगडी जलाशय हे प्रमुख पर्यटनस्थळ आहेत. या स्थळांचा विकास करण्यासाठी सरकारने ३ कोटी ३० लाख ८० हजार रूपये दिले आहेत. यापैकी ४६ लाख १४ हजारांचा निधी वितरीत करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासन सांगत आहे. चालू वर्षासाठी २ कोटी ८४ लाख रूपयांचा निधी उपलब्ध असल्याचे प्रशासनाचे म्हणने आहे. एप्रिल २०१६ पासून आतापर्यंत १० महिन्यात ६० लाखांच्या कामांनाच प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. मागच्या वर्षीच्या कामांसाठी १६ लाख ५९ हजार २९० रूपये वितरीत करण्यात आले. चालू वर्षात प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांवर ३० लाख रूपये वितरीत करण्यात आले. असा एकूण ४६ लाख ५९ हजार २९० रूपयाचा निधी वितरीत करण्यात आला आहे. परंतु १३ पैकी फक्त चारच पर्यटन स्थळांवर तुरळक प्रमाणात खर्च करण्यात आला. हाजराफॉलकडे अधिक लक्ष जिल्हा प्रशासनाने सन २०१६-१७ या वर्षात ७६ लाख ५९ हजार रूपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली. या रकमेतून आठ कामे करण्यात येणार असून आठ पैकी चार कामे हाजराफॉल येथे करण्यात येत आहेत. १० लाखातून रस्ता खडीकरण, १० लाखातून संरक्षण भिंत, १० लाख सौंदर्यीकरणासाठी, १० लाख नाली बांधकामासाठी, कचारगडच्या मैदानाच्या सपाटीकरणासाठी १० लाख, सिमेंट रस्त्यासाठी १० लाख, चोरखमारा ते शिवमंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी ९ लाख ९ लाख ९९ हजार ७३१ रूपये तर बोदलकसा येथील विश्रामगृह रस्त्याच्या सिमेंट बांधकामासाठी ९ लाख ९९ हजार २३४ रूपये मंजूर करण्यात आले. या पर्यटन स्थळांवर तूरळक कामे करण्यात आली, परंतु इतर पर्यटन स्थळांवर कवडीही खर्च करण्यात आली नाही. अडीच कोटी पडून असताना पर्यटनस्थळांचा विकास करण्यास जिल्हा प्रशासन मागे पडत आहे. प्रादेशिक पर्यटन योजनेतून ‘केळझरा’चा विकास वनपर्यटन/इको टुरीझमच्या माध्यमातून शासनाने प्रादेशिक पर्यटन योजनेतून ४ जानेवारी २०१७ रोजी एक कोटी ३६ लाख ६६ हजार रूपये पर्यटन व सांस्कृतिक मंत्रालयाने मंजूर केले आहे. या रकमेचा पहिला हप्ता २० लाख रूपये देण्यात आला. ती रक्कम जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक १ यांना सोपविली आहे. शासनाने मंजूर केलेल्या एक कोटी ३६ लाख ६६ हजार रूपयातून ७० लाख ९७ हजाराचे सभामंडप, २३ लाख १६ हजार रूपयातून प्रवेशद्वार, ३२ लाख ९४ हजारातून शौचालय, ४ लाख ३१ हजारातून सेप्टीक टँक, दोन लाख ८९ हजारातून दोन हातपंप, २ लाख ३९ हजारातून रेन वॉटर हार्वेस्टींग तयार करण्यात येणार आहे.