गोंदिया : राज्यासह जिल्ह्यातही कोरोना आपला उद्रेक दाखवित आहे. यामुळे जिल्ह्यात बाधितांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. शुक्रवारीही (दि. १२) जिल्ह्यात मात करणाऱ्यांपेक्षा बाधितच दुप्पट निघून आले आहेत. यात २६ नवीन बाधितांची भर पडली असून, १३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यानंतर आता जिल्ह्यातील बाधितांची संख्या १४६५० झाली असून, १४२६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यात कोरोनाचा वाढता उद्रेक नक्कीच टेन्शन वाढविणारा आहे. विशेष म्हणजे, काही जिल्ह्यांत कोरोनाचा पुन्हा एकदा स्फोट झाला असून, तेथे लॉकडाऊन करावा लागत आहे. कोरोनाचा वाढता उद्रेक आता जिल्ह्यातही दिसून येत असून, हळूवार का असेना मात्र बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे. यामुळे मध्यंतरी कोरोना नियंत्रणात असताना बाधित कमी व मात करणारे जास्त ही स्थिती होती. मात्र, आता बाधितांची संख्या मात करणाऱ्यांपेक्षा जास्त झाली आहे. शुक्रवारी (दि. १२) जिल्ह्यात २६ बाधित आढळले असून, यामध्ये गोंदिया तालुक्यातील १४, तिरोडा १, गोरेगाव १, आमगाव १, देवरी ७, सडक-अर्जुनी १, तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील एक रुग्ण आहेत, तर १३ ग्णांनी कोरोनावर मात केली असून, यामध्ये गोंदिया तालुक्यातील १०, गोरेगाव १, सडक-अर्जुनी १, तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील एक रुग्ण आहे.
यानंतर आता जिल्ह्यात १९७ क्रियाशील रुग्ण असून, यात गोंदिया तालुक्यातील १२५, तिरोडा १३, गोरेगाव ६, आमगाव २२, सालेकसा ५, देवरी १२, सडक-अर्जुनी ८, अर्जुनी-मोरगाव चार, तर इतर राज्य व जिल्ह्यातील दोन रुग्ण आहेत. यातील १५४ रुग्ण घरीच अलगीकरणात असून, यामध्ये गोंदिया तालुक्यातील १०३, तिरोडा ११, गोरेगाव ३, आमगाव १८, सालेकसा ३, देवरी ९, सडक-अर्जुनी ५, तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील दोन रुग्ण आहेत. या स्थितीनंतर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.४५ टक्के असून, मृत्यू दर १.२० टक्के, तर द्विगुणीत गती ३८०.२ दिवस एवढी नोंदण्यात आली आहे.
-----------------------------
आतापर्यंत १८७ रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यात कोरोनाच्या कहरामुळे आतापर्यंत १८७ रुग्णांचा जीव गेला आहे. तालुकानिहाय बघितल्यास गोंदिया तालुक्यातील १०५, तिरोडा २४, गोरेगाव ६, आमगाव १३, सालेकसा ३, देवरी १०, सडक-अर्जुनी ५, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ११, तर इतर राज्य व जिल्ह्यातील १० रुग्ण आहेत.
-----------------------
१५३०८६ कोरोना चाचण्या
कोरोनाचा वाढता उद्रेक बघता आता जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर दिला जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १५३०८६ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये ७९०९२ आरटी-पीसीआर चाचण्या असून, यात ८६९० पॉझिटिव्ह, तर ६६६२० निगेटिव्ह आहेत. तसेच ७३९९४ रॅपीड ॲंटिजन चाचण्या असून, यातील ६२४६ पॉझिटिव्ह, तर ६७७४८ निगेटिव्ह आल्या आहेत.