शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
3
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
5
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
6
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
7
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
8
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
9
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
10
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
11
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
12
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
13
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
14
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
15
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
16
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
17
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
18
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
19
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
20
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी

नागपूरच्या बाल सुधारगृहातून फरार दोन बालकांना पकडले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 3:52 PM

शहर डीबी पथकाने ताब्यात घेतले: तीन महिन्यांपूर्वी दरोडा घालण्याचा केला होता प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : शहरात मागील ३-४ महिन्यांपूर्वी गोंदिया ते ढाकणीकडे जाणाऱ्या रोडवरील रेल्वे सुन्नी चौकी येथे अवैध शस्त्रानिशी दरोड्याच्या प्रयत्नात असलेला आरोपी राहुल जसवानी (रा. श्रीनगर, गोंदिया) याच्यासह पकडलेले दोन अल्पवयीन बालके नागपूरच्या बाल सुधारगृहातून २० नोव्हेंबर रोजी फरार झाले. गोंदिया शहर ठाण्याच्या डीबी पथकाने या दोन्ही बालकांना गोंदियात पकडले.

गोंदिया शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता ३१० (४) सहकलम ४, २५ भारतीय हत्यार कायदा, १३५ महाराष्ट्र पोलिस कायदा अन्वये गुन्हा नोंद केला होता. या गुन्ह्यातील आरोपींसोबत दोन १६ ते १७ वर्षे वयोगटातील विधीसंघर्ष बालके सुद्धा होते. त्यांना सुद्धा ताब्यात घेतले होते, तेव्हापासून ते बालसुधारगृह नागपूर येथे होते. त्यापैकी एक १७ वर्षीय विधीसंघर्षित बालक हा पोलिस ठाणे इमामवाडा नागपूर येथील चोरीच्या गुन्ह्यात बाल सुधारगृह नागपूर येथे बंद असलेल्या अन्य एका १६ वर्ष वयोगटाच्या विधीसंघर्ष बालकासोबत २० नोव्हेंबर २०२४ रोजी पळून गेले. बाल सुधारगृह नागपूर येथून फोनद्वारे पोलिस ठाणे गोंदिया शहर येथे माहिती देण्यात आली. त्या अनुषंगाने पोलिस ठाणे गोंदिया शहर येथील पोलिस निरीक्षक किशोर पर्वते यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक हे पेट्रोलिंग करीत असताना, त्यांना २१ नोव्हेंबर २०२४ रोजी दोन्ही बालकांना पकडण्यात आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरचे पोलिस निरीक्षक किशोर पर्वते, डीबी पथकाचे पोलिस हवालदार जागेश्वर उईके, कवलपालसिंग भाटिया, सुदेश टेंभरे, सतीश शेंडे, निशिकांत लोंदासे, दीपक रहांगडाले, प्रमोद चव्हाण, महिला पोलिस हवालदार रिना चव्हाण, पोलिस शिपाई दिनेश बिसेन, सुभाष सोनवाणे, मुकेश रावते, कुणाल बारेवार व अशोक रहांगडाले यांनी केली आहे.

त्या बालकांवर नागपूरच्या कपिलनगर येथे गुन्हा दाखलबाल सुधारगृह नागपूर येथून पळून आलेल्या गोंदिया येथील विधीसंघर्ष बालक १७ वर्ष हा अन्य एका मुलासोबत सुन्नी चौकी ते कुंभारेनगर गोंदियाकडे येणाऱ्या रोडवर फिरत असल्याची गुप्त माहिती मिळाली. पथकाने तेथे जाऊन दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर पोलिस ठाणे कपिलनगर नागपूर येथे गुन्हा दाखल असल्याने दोन्ही विधीसंघर्ष बालकांना त्यांच्या ताब्यात देण्यात आले. 

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीCrime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर