पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोरगाव येथील महादेव किसन राऊत यांनी केलेल्या तक्रारीवरुन गट क्रमांक ३६६ मधील ०.६७ हेआर. शेतजमिनीत रब्बी हंगामात धानाची लागवड केली होती. धानाच्या पेरणीपासून ते धानाची पीक हातात येईपर्यंत महादेव राऊत यांनी धानपिकाची देखभाल केली. मे महिन्याच्या पंधरवाड्यात धानाची कापणी करुन कडपा बांधीत होत्या. १९ मेच्या रात्री ८ वाजे ते २० मेच्या सकाळी ६ वाजेच्या दरम्यान बांध्यातील धानाच्या कडपा चोरुन नेऊन गावाजवळील निलज येथे चुरुन घेतले. गावातीलच प्रभू जनार्धन मस्के (५६), माणिक जनार्धन मस्के (५०) या दोन भावांनी संगणमत करुन चोरुन नेले. अंदाजे किमत ६७ हजार ५०० रुपये किमतीचे धान चोरुन नेल्याच्या आरोपावरुन त्या दोघांही भावांच्या विरोधात कलम ३७९, ४४७, ३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंदवून गजाआड करण्यात आले. पोलीस निरीक्षक महादेव तोदले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नायक देव्हारे यांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास तपास अंमलदार पोलीस हवालदार यशवंत मडावी करीत आहेत.
धान चोरुन नेणारे दोन आरोपी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2021 4:22 AM