लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सध्या उन्हाळ््याच्या सुट्या सुरू असून वाढलेल्या प्रवाशांच्या गर्दीच्या फायदा घेत मोबाईल चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना रेल्वे स्पेशल टास्क टीमने पकडले आहे. या दोन कारवायांत टीमने दोघांक डून दोन महागडे मोबाईल जप्त केले आहेत. ३० एप्रिल व १ मे रोजी टास्क टीमने या कारवाया केल्या आहेत.रेल्वेत वाढत्या चोरीच्या घटनांवर टास्क टीम नजर ठेवून असताना ३० एप्रिल रोजी सकाळी १०.४५ वाजता हटिया-पुणे एक्स्प्रेस (गाडी क्रमांक २२४६) मध्ये मध्यप्रदेशातील पोलीस जवान प्रवासी बलराम पाटिदार (२४) गोंदिया येथून मंदसौर या आपल्या गावीत जात असताना रेकॉर्डवरील आरोपी आकाश राधेश्याम भालाधरे (२०,रा.सिंगलटोली) याने धावत्या गाडीत त्यांचा मोबाईल हिसकाविला. आकाश गाडीतून कुदला असतानाच टीमच्या सदस्यांनी त्याला पकडले व त्याच्याकडून २१ हजार रूपये किंमतीचा मोबाईल जप्त केला.तर दुसºया कारवाईत, बुधवारी (दि.१) बल्लारशाह (गाडी क्रमांक ५८८०३) प्रवासी गाडी दुपारी १२ वाजता आली असता देवदास हेमराज चौैधरी (२२,रा.एकोडी, साकोली) हे गाडीतून उतरत असताना त्यांचा ११ हजार ५०० रूपयांचा मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी तैनात असलेल्या टीमच्या सदस्यांना दिली. यावर टीमच्या सदस्यांनी तपास सुरू केला असता एक व्यक्ती त्यांना मोबाईलचे सीमकार्ड काढताना व त्याला पॅटर्न लॉक उघडण्याचा प्रयत्न करताना दिसला.यावर त्याला पकडून चौकशी केली असता त्याने जितेंद्र वसंता मस्के (३५,रा.सिरोली, अर्जुनी-मोरगाव) असे आपले नाव सांगीतले. तसेच चौधरी यांना समोर आणून मोबाईल दाखविला असता त्यांनी मोबाईल ओळखून कागदपत्र सादर केले. टीमच्या सदस्यांनी दोघांना रेल्वे पोलिसांच्या सुपूर्द केले असून त्यांच्यावर कलम ३७८ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दोन मोबाईल चोरट्यांना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2019 9:19 PM
सध्या उन्हाळ््याच्या सुट्या सुरू असून वाढलेल्या प्रवाशांच्या गर्दीच्या फायदा घेत मोबाईल चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना रेल्वे स्पेशल टास्क टीमने पकडले आहे. या दोन कारवायांत टीमने दोघांक डून दोन महागडे मोबाईल जप्त केले आहेत. ३० एप्रिल व १ मे रोजी टास्क टीमने या कारवाया केल्या आहेत.
ठळक मुद्देरेल्वे टास्क टीमची कारवाई : चोरलेले दोन मोबाईल लंपास