२२ लाखांतून मिळणार सेवा : तिरोडा व अर्जुनी-मोरगावचा समावेशगोंदिया : जिल्हा आदिवासी व नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील महिला मंडळी गर्भावस्थेत खानपानाकडे लक्ष देत नसल्याने बालके कुपोषित होतात. जिल्ह्यातील तिरोडा व अर्जुनी-मोरगाव या दोन तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. या दोन्ही तालुक्यात बाल उपचार केंद्र सुरू करण्यासाठी प्रत्येक तालुक्याला ११ लाख रूपये देण्यात आले आहे. कुपोषणाच्या श्रेणीतील सॅम व मॅम बालकांच्या व्यवस्थापनाकरीता तसेच महाराष्ट्र राज्याचा अर्भक मृत्यूदर कमी करण्यासाठी १३ व्या वित्त आयोगातून ही दोन बाल उपचार केंद्र सुरू करण्यात येत आहेत. ग्रामीण भागासाठी अर्जुनी मोरगाव आदिवासी तर गैरआदिवासी भाग म्हणून तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात हे बाल उपचार केंद्र सुरू करण्यात येणार आहे. मागील दोन वर्षापूर्वी या दोन तालुक्यात कुपोषणाचे मोठे प्रमाण होते. त्याला पाहून शासनाने या दोन तालुक्यात बाल उपचार केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्रातील ३० तालुक्यांचा समावेश असून यात गोंदिया जिल्ह्यातील दोन तालुके आहेत. या दोन बाल उपचार केंद्रासाठी शासनाने २२ लाख रूपये पाठविले आहेत. अर्भक, लहान बालके व संगोपनाच्या योग्य पध्दती या केंद्रातून सांगितल्या जाणार आहे. बालक कुपोषित होण्यामागील कारणही शोधले जाईल. सद्यस्थितीत अर्जुनी मोरगाव तालुक्यात १७० बालके तर तिरोडा तालुका ८८ बालकी कुपोषित आहेत. (तालुका प्रतिनिधी)१० बेडचे केंद्र कुपोषित बालकांना दाखल करण्यासाठी या बाल उपचार केंद्रात १० खाटांची व्यवस्था राहणार आहे. वॉर्ड, स्वयंपाक घर, स्रानगृह, टॉयलेट,वॉर्डात लागणारी उपकरणे, स्वयंपाक घरातील उपकरणे,पाणी पुरवठा, विद्युत पुरवठा, डासनाशक व माशा रोधक गोळ्या, बालकांना खेळण्यासाठी साहित्य, त्या बालकांसोबत असणाऱ्या मातांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. हे केंद्र १९५० चौरस फूटाचे आहे. मातांना मिळणार बुडीत मजुरीबाल उपचार केंद्रात दाखल झालेल्या कुपोषित बालकांच्या उपचारासाठी त्या बालकांच्या माता येतात. त्या माता गरिब कुटुंबातील असल्यामुळे त्यांना आपली मजुरी सोडून बालकांना बाल उपचार केंद्रात दाखल करणे म्हणजे मजुरी बुडवावी लागते. त्या महिलांनी आपल्या बाळांना योग्य उपचार देण्यासाठी त्या सहजरित्या तयार व्हाव्यात यासाठी मातांसाठी बुडीत मजूरी देण्यात येते. १२० रूपये दररोज बुडीत मजूरी मातांना १४ दिवसाची देण्यात येणार आहे. एका मातेला १४ दिवसाची बुडीत मजूरी म्हणून बालकाला रूग्णालयातून सुट्टी देतांना १६८० रूपये देण्यात येणार आहे. बालकांचे होणार मनोरंजन या बाल उपचार केंद्रात दाखल झालेल्या प्रत्येक बालकाला किमान ३० मिनीटे खेळता येईल अश्याप्रकारे बालकांच्या मनोरंजक सामजिक वाढीला चालना देण्यासाठी अक्षरांची जुळवा-जुळव, उंचीनुसार क्रम लावणे, रंग व आकाराचे ज्ञान देण्यासाठी गोल, चौकोण, त्रिकोण, आयत अश्या रंगीत वस्तूंची ओळख करून देण्यात येणार आहे.
कुपोषणमुक्तीसाठी दोन बाल उपचार केंद्र
By admin | Published: February 21, 2016 12:59 AM