प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना बाक्टी कार्यक्षेत्रातील गावात कोरोनाचे संक्रमण सुरूच आहे. गावागावांतील नागिरक कोरोनाबाधित गृहविलगीकरणात राहून औषधोपचार घेत आहेत. अनेकांनी घरांमध्ये एकांतवासात राहूनसुद्धा कोरोनावर मात केली; परंतु मागील आठवड्यापासून कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे सत्र सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मृत्यूनंतर कोरोना टेस्ट
चान्ना येथील एका रुग्णाला दोन-तीन दिवसांपूर्वी अशक्तपणा जाणवू लागला. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन त्यांनी उपचार केला. सलाईनसुद्धा लावून देण्यात आली आणि आज एकाएकी दुपारच्या वेळी त्यांचे निधन झाले. गावातील कोणी सुज्ञ नागरिकाने वरिष्ठांना मृत्यूची माहिती दिल्यानंतर स्थानिक आरोग्य प्रशासनाला जाग आली. वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन कुलसुंगे यांनी मृतकाचे घर गाठले. या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतरसुद्धा रॅपिड अँटिजेन टेस्ट केली. त्यात मृतकाचा नमुना कोरोना पॉझिटिव्ह आला.
.....