कपिल केकत ।ऑनलाईन लोकमतगोंदिया : थंड पडलेल्या मालमत्ता कर वसुली विभागाचा कारभार जोमात यावा यासाठी मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी कठोर पाऊल उचलले आहेत. यातंर्गत त्यांनी कर विभागातील दोन कर्मचाऱ्यांचे विभागातून स्थानांतरण केले असून अन्य कर्मचाऱ्यांना शो-कॉज नोटीस दिले आहे. शिवाय कर वसुलीसाठी विशेष पथकाचे गठन केले आहे.नगर परिषदेला मागील थकबाकी व चालू मागणी असे एकूण ९.२० कोटींचे टार्गेट आहे. नगर परिषदेला १०० टक्के कर वसुली शक्य नसली तरीही मागील वर्षीचा आकडा तरी पार व्हावा हे अपेक्षीत आहे. मात्र सध्याची परिस्थिती बघता नगर परिषदेची मालमत्ता कर वसुली यंदा वांद्यात दिसून येत असून मागील वर्षीचा आकडाही पार होण्याबाबत शंकाच दिसून येत आहे. कारण कर वसुली विभागाने आतापर्यंत २.७३ कोटींचीच वसुली केली असल्याची माहिती. मागील वर्षी नगर परिषदेने ५२ टक्के कर वसुली केली होती. म्हणजेच यंदा नगर परिषदेला येत्या २० दिवसांत सुमारे दोन कोटींची कर वसुली करावी लागणार आहे. असे न झाल्यास मागील वर्षीची टक्केवारी गाठता येणार नाही, व ही चिंतेची बाब आहे.यामुळे नगर परिषदेच्या कर वसुली विभागाचा थंड कारभार बघता मुख्याधिकारी पाटील यांनी कर विभागातील दोन कर्मचाºयांचे अन्य विभागांत स्थानांतरण केले आहे. या दोन्ही कर्मचाऱ्यांची कार्यप्रणाली बघता त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती असून यात कमल यादव नामक कर्मचाऱ्याला बांधकाम विभागात तर गणेश मौजे नामक कर्मचाऱ्याला अन्य विभागात स्थानांतरीत केले आहे. शिवाय अन्य दोन कर्मचाऱ्यांना ताकीद दिली असतानाच अन्य कर्मचाऱ्यांना शो-कॉज देण्यात आल्याची माहिती आहे.लोकमतच्या बातमीची दखलमालमत्ता कर वसुली यंदा वांद्यात असल्याचा हा प्रकार ‘लोकमत’ने शनिवारी (दि.९) बातमीच्या माध्यमातून उजेडात आणला होता.‘कृती पेक्षा मुनादीवर भर’ या मथळ््याखाली बातमी प्रकाशित करून कर विभागाची स्थिती ‘लोकमत’ने मांडली होती. या बातमीची दखल घेत मुख्याधिकारी पाटील यांनी लगेच कर विभागाचा कारभार सुरळीत करण्यासाठी पाऊल उचलले. त्यांच्या या कारवाई नंतर तरी काही फरक पडणार काय हे आता येणाºया दिवसांतच कळेल.पगार थांबविले, सुट्या केल्या रद्दजास्तीत जास्त कर वसुली व्हावी यासाठी मुख्याधिकारी पाटील यांनी कर विभागातील कर्मचाऱ्यांचे पागर थांबविल्याची माहिती आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांच्या सर्वच सुट्या रद्द केल्या आहेत. आता फोकस कर वसुलीवर करण्यासाठी त्यांनी हा प्रयोग अंमलात आणला आहे. जास्तीत जास्त कर वसुली झाल्यास त्याचा फायदा नगर परिषदेलाच मिळणार असल्याने त्यांनी कर विभागातील कर्मचाऱ्यांना काही दिवसांसाठी सक्तीने घेतले आहे.सोमवारपासून कर वसुली मोहीमकर वसुलीसाठी मुख्याधिकारी पाटील यांनी विशेष पथकाचे गठन केले आहे. सोमवारपासून हे पथक शहरात वसुलीसाठी निघणार असून मुख्याधिकारी पाटील सुद्धा यात सहभागी होणार असल्याची माहिती आहे. शिवाय कर वसुली विभागाची जबाबदारी एकाच व्यक्तीवर राहून त्यावर ताण पडू नये यासाठी प्रभागांची दोन गटात विभागणी करून दोन जणांवर वसुलीची जबाबदारी टाकली जाणार आहे. यात प्रभाग क्रमांक १ ते १० ची जबाबदारी बाजार निरीक्षक मुकेश मिश्रा यांच्यावर तर प्रभाग क्रमांक ११ ते २१ ची जबाबदारी तत्कालीन प्रभारी कर निरीक्षक श्याम शेंडे यांच्यावर टाकली जाणार असल्याची माहिती आहे.
कर विभागातील दोन कर्मचाऱ्यांना दिला डच्चू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 12:21 AM
थंड पडलेल्या मालमत्ता कर वसुली विभागाचा कारभार जोमात यावा यासाठी मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी कठोर पाऊल उचलले आहेत. यातंर्गत त्यांनी कर विभागातील दोन कर्मचाऱ्यांचे विभागातून स्थानांतरण केले असून अन्य कर्मचाऱ्यांना शो-कॉज नोटीस दिले आहे.
ठळक मुद्देसोमवारपासून विशेष मोहीम : वसुलीसाठी विशेष पथकाचे गठन