शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

पुजारीटोला धरणाचे दोन दरवाजे उघडले; वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ  

By अंकुश गुंडावार | Published: July 11, 2023 7:51 PM

धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे.

गोंदिया : धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाचे दोन दरवाजे मंगळवारी (दि.११) सायंकाळी ०.३० मीटरने उघडण्यात आले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

जिल्ह्यात अद्यापही दमदार पावसाने हजेरी लावली नाही. सोमवारी रात्री जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली असून गेल्या २४ तासात सरासरी २३.१० मिमी पावसाची नोंद झाली आहे. गोंदिया लगतच्या भंडारा जिल्ह्यात आणि धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. तर वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने पुजारीटोला धरणाचे दोन दरवाजे ०.३० मीटरने उघडण्यात आले. तर कालीसरार धरणाचे दरवाजे सुध्दा रात्रीे उशीरापर्यंत उघडण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांना तसेच नदीपात्रातून ये-जा करणाऱ्यांनी स्वतः ची काळजी घ्यावी असा सतर्कतेचा ईशारा दिला आहे. सोडण्यात आलेला विसर्ग सामान्य असला नागरिकांनी कृपया नदीपात्र ओलांडू नये, शेतीची अवजारे नदीपात्रात ठेवू नये जनावरांना नदीपात्र ओलांडू देऊ नये, जलाशयात येणारा येवा पाहून विसर्ग कमी जास्त करण्यात येऊ शकतो त्यामुळे नदीपात्राजवळ जाणे टाळावे. कोणत्याही नागरिकास काही अडचण आढळून आल्यास जिल्ह्याच्या खालील दिलेल्या मदतकेंद्र क्रमांकावर संपर्क साधावा असे कळविले आहे.

केवळ ६ टक्के रोवण्या पुर्णजिल्ह्यात अद्यापही दमदार पावसाने हजेरी लावली नसल्याने रोवणीच्या कामाला वेग आला नाही. जिल्ह्यात १ लाख ९८ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात येणार आहे. तर आतापर्यंत केवळ ३८ हजार १८६ हेक्टरवर रोवणी झाली असून त्याची टक्केवारी ६.६ टक्के झाली आहे.

दमदार पावसाची प्रतीक्षा कायमजुलै महिना अर्धा संपत आला तरी अद्यापही जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावलीे नाही. त्यामुळे रोवणीची कामे पुर्णपणे खोळंबली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. 

टॅग्स :gondiya-acगोंदिया