लोकमत न्यूज नेटवर्कपरसवाडा : मध्यप्रदेशातील दारुची छत्तीसगडमध्ये तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना २ लाखांच्या दारु साठ्यासह पकडले. ही कारवाई दवनीवाडा पोलिसांनी धापेवाडा -गोंदिया मार्गावरील सोनपुरीजवळ गुरूवारी (दि.२१) रात्रीच्या सुमारास केली.संजीवकुमार रामप्रवेश मिश्रा (२१) रा. सुपेला भिलाई छत्तीसगड, व जागेश्वर शिवकुमार शाहू (२२) रा. दुर्ग छत्तीसगड असे पोलिसांनी दारुची तस्करी करताना पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार मध्यप्रदेशातील वाराशिवणी खैरलांजीवरुन धापेवाडा-गोंदिया मार्गे झायलो क्रमांक एमपी १५/एमई ०० ने दारुची वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती दवनीवाडा पोलिसांना मिळाली.या माहितीच्या आधारावर दवनीवाडा पोलिसांनी पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांच्या नेतृत्त्वात धापेवाडा-गोंदिया मार्ग सोनपुरी टी-पार्इंटवर नाकाबंदी केली. त्यानंतर सदर क्रमांकाचे वाहन टी पार्इंटवर येताच वाहन थांबवून चालकाची विचारपूस केली. वाहनाची तपासणी केली असता मागील सीटवर ४० पेट्या गोवा ब्रँन्डची दारु आढळली.याप्रकरणी चालक संजीवकुमार मिश्रा व जागेश्वर शाहू यांना झायलो वाहनासह ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध दवणीवाडा पोलीस स्टेशन येथे दारुबंदी कायदान्वये गुन्हा दाखल केला. आरोपींकडून एकूण ७ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक दीपक जाधव व रामकुमार पवार, विजय खोब्रागडे, धनेश्वर पिपरेवार, संतोष शेंडे, प्रदीप तुरकर, सुमीत रहांगडाले, बुधराम डोहरे, मनिष करपगावे यांनी केली.छत्तीसगडमध्ये पुरवठागोंदिया जिल्ह्याला मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्याची सीमा लागून आहे. त्यामुळे दारुसह इतर वस्तुंची तस्करी करणारे गोंदिया मार्गाचा वापर करतात. दवनीवाडा पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींनी सदर दारु मध्यप्रदेशातील वाराशिवणी खैरलांजी येथून छत्तीसगड राज्यात नेत असल्याचे सांगितले. दर आठवड्याला दारुचा पुरवठा करीत असल्याची कबुुली दिली. त्यामुळे दारुचीे तस्करी करणाºयाचे जाळे चांगलेच दूरवर पसरल्याचे चित्र आहे.नाकाबंदीत वाढ करण्याची गरजतिरोडा तालुक्यातून धापेवाडा मार्गे मध्यप्रदेशात जाता येते. या मार्गावर वर्दळ देखील कमी असते त्यामुळे दारुसह गांजा व इतर वस्तूंची तस्करी करण्यासाठी याच मार्गाचा सर्वाधिक वापर करतात. मागील काही दिवसांपासून या प्रकारात वाढ झाली. लोकमतने यापूर्वी या प्रकाराकडे लक्ष वेधले होते. दारुच्या वाढत्या तस्करीचा प्रकार लक्षात घेता पोलिसांनी गस्तीत वाढ करण्याची गरज आहे.
छत्तीसगडमध्ये जाणारी दोन लाखांची दारु पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 12:37 AM
मध्यप्रदेशातील दारुची छत्तीसगडमध्ये तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना २ लाखांच्या दारु साठ्यासह पकडले. ही कारवाई दवनीवाडा पोलिसांनी धापेवाडा -गोंदिया मार्गावरील सोनपुरीजवळ गुरूवारी (दि.२१) रात्रीच्या सुमारास केली.
ठळक मुद्देदवनीवाडा पोलिसांची कारवाई : मध्यप्रदेशातून दारुची तस्करी