गोंदिया : येथील उपविभागीय पोलीस अधिकारी व त्यांच्या पथकाने गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन मोटारसायकल चोरट्यांना अटक केली. ही कारवाई ८ जानेवारी रोजी करण्यात आली.
उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे या दोन आरोपींना अटक केली आहे. रुपेश ऊर्फ रफ्तार रामटेके (२३) रा.आसोली व सुमित सहेसराम बागडे (१९) रा. बटाणा यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन मोटारसायकल जप्त केल्या आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे, सहायक पोलीस निरीक्षक दिलीप कुंदोजवार, सहायक फौजदार उमराव शरणागत, पोलीस नायक खेमराज बोधनकर, प्रकाश गायधने, अशोक अंबरवाडे, दुर्गाप्रसाद कनोजे, सुधीर भालाधरे ,महिला पोलीस शिपाई ज्योती बांगरे, वाहन चालक पोलीस हवालदार अशोक कांबळे यांनी केली आहे.