लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील ९७ रिक्त पदांसाठी घेण्यात येत असलेल्या पोलीस शिपाई भरतीची शारीरिक चाचणी प्रक्रिया पूर्ण झाली. लेखी परीक्षेसाठी २ हजार १२१ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. यात १ हजार ६८१ पुरुष तर ४४० महिला उमेदवारांचा समावेश असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.जिल्ह्यात पोलीस शिपाई भरती प्रक्रियेला १२ मार्चपासून सुरुवात झाली. १२ ते २७ मार्च दरम्यान शारीरिक व मैदानी चाचणी घेण्यात आली. ५० टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेणाऱ्या उमेदवारांची संख्या ६ हजार ७१० आहेत. यात ५ हजार ५०८ पुरुष तर २ हजार २०२ महिला आहेत. सामाजिक व समांतर आरक्षणांतर्गत प्रवर्ग निहाय एका जागेसाठी १५ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात आले आहेत. या भरतीत कट-आॅफ गुण खुला सर्वसाधारण गटासाठी ९०, महिला ७४, खेळाडू ८४, प्रकल्पग्रस्त ८६, भुकंपग्रस्त ७६, माजी सैनिक ७५, पोलीस पाल्ये ६३, गृहरक्षक दल ७२, अनुसूचित जातीसाठी ८४, अनुसूचित जमातीसाठी ८६, विमुक्त जाती अ ८८, भज-ब ८६, भज-क ८६, भज-ड ८६, विशेष मागास प्रवर्ग ८६ व इतर मागासवर्गीय ८६ असून या गुणांवरील उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड करण्यात आली. या शारीरिक चाचणी दरम्यान उमेदवारांची गाºहाणी ऐकण्यासाठी १ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजतापर्यंत वेळ देण्यात आली होती. या शारीरिक चाचणीतील २ हजार १२१ उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड करण्यात आली. शुक्रवारी (दि.६) सकाळी ६ ते ७.३० वाजता पोलीस मुख्यालयातील मैदानात लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठी शुक्रवारी सकाळी ५ वाजताच उमेदवारांना हजर राहणे आवश्यक आहे. शारीरिक व मैदानी चाचणीच्या वेळेस देण्यात आलेले ओळखपत्र व महाआॅनलाईनमार्फत देण्यात येणारे लेखी परीक्षेचे प्रवेश पत्र उमेदवारांना परीक्षेसाठी घेऊन यायचे आहे. तर पेन, पेन्सील, पुस्तक, बॅग, मोबाईल हे साहित्य उमेदवारांनी परीक्षेच्या स्थळी आणू नये असे पोलीस अधीक्षक भुजबळ यांनी सांगितले आहे.
दोन हजारांवर उमेदवार देणार लेखी परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 12:38 AM
गोंदिया जिल्ह्यातील ९७ रिक्त पदांसाठी घेण्यात येत असलेल्या पोलीस शिपाई भरतीची शारीरिक चाचणी प्रक्रिया पूर्ण झाली. लेखी परीक्षेसाठी २ हजार १२१ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.
ठळक मुद्देपोलीस शिपाई भरती : ५० टक्के उमेदवार पदवीधर