प्राप्त माहितीनुसार कुऱ्हाडी-पिंडकेपार मार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी गस्तीवर असताना एक अज्ञात युवक दुचाकीवर एक मोठी बॅग घेऊन जात होता. त्याच्या संशयास्पद हालचालीवरून पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असता त्याने दुचाकी उभी करून चावी घेऊन पसार झाला. हिरो होंडा डिलक्स वाहन (क्र. एमएच ३५ एएन ९२५९) या वाहनावर ठेवलेल्या दोन पिशव्यांची तपासणी केली असता दोन पिशव्यांत रबरी ट्यूबमध्ये ७० लिटर मोहाची दारू मिळून आली. पोलिसांनी दारू व दुचाकी असा ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी देवरी पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील परळे यांनी केली.
दुचाकीने दारूची तस्करी ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 4:30 AM