लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : घरावरून गेलेल्या वीज वाहिन्यांना स्पर्श होउन तसेच घराच्या अगदी जवळून जाणाऱ्या वीज वाहक तारांना स्पर्श होऊन अनेकांचा जीव गेल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. या अपघातात झालेले नुकसान न भरून निघणारे आहेत. त्यामुळे वीजेचा अपघात टाळण्यासाठी इतर सुरिक्षततेच्या घर किंवा कोणत्याही प्रकारचे बांधकाम करायला नको, असे आवाहन महावितरण कडून करण्यात आले आहे .विजेच्या पुढे क्षमा नाही हे माहित असतानाही काही ठिकाणी उच्चदाब वीज वाहिन्यांखाली सर्रासपणे बांधकाम झालेले आणि होत असल्याचे दिसून येते. तसेच अनेक ठिकाणी बांधकाम करताना हेतुपुरस्सरपणे वीज नियमांचे पूर्णपणे उल्लंघन होत असल्याचे दिसून येते. वीज वाहिन्यांचा धोका लक्षात घेता त्यांच्याखाली बांधकामाची परवानगी देऊ नये, अशी कायद्यात तरतूद आहे. मात्र असे असतानाही अनेक ठिकाणी बांधकाम करण्यात आले असून सर्रास सुरु आहे.तसेच शहर व गावांचाही विस्तार सुरु असल्याने लोकवस्ती दूरवर पसरली आहे . पण बांधकामाची परवानगी देण्यापूर्वी त्याची तपासणी करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची आहे. तसेच नियमाचे उल्लंघन झाले, असे आढळल्यास असे बांधकाम पडण्याची तरतूद वीज कायद्यात आहे.नियमातील तरतुदीप्रमाणे बांधकाम करताना वीज वाहिन्यांपासून अंतर ठेऊनच बांधकाम करायला पाहिजे, जेणेकरून अपघात होणार नाही.मात्र नियमबाह्य आढळल्यास महावितरणकडून अशा ठिकाणी कारवाई होईल. तसेच हे बांधकाम पाडण्यासाठी महावितरण संबंधित महापालिका किंवा ग्रामपंचायतकडे प्रस्ताव पाठवू शकते, अशी तरतूद आहे मात्र प्रत्येकाने सुरक्षेसाठी या बाबींचा अंमल करण्याचीही गरज आहे. ट्रान्सफॉर्मर, फिडर फिलर किंवा खांबावर शॉटसर्किट झाल्यावर त्याठिकाणी नागरिकांनी जाऊ नये व लागेच महावितरणला कळवावे.अशी घ्यावी काळजीवीज उपकरणांना पाणी लागू देऊ नका. वीज उपकरणे ओलाव्यापासुन दूर ठेवा. लोखंडी तारेवर कपडे वाळत घालू नका. ओल्या कपडयांवर इस्त्री फिरवू नका. बांधकाम करतांना वीजेच्या तारांना स्पर्ष होणार नाही, याबाबत दक्ष राहणे आवश्यक असल्याचे महावितरणकडून कळविण्यात आले आहे.
वीज वाहिन्यांखाली घराचे बांधकाम नकोच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 9:51 PM
घरावरून गेलेल्या वीज वाहिन्यांना स्पर्श होउन तसेच घराच्या अगदी जवळून जाणाऱ्या वीज वाहक तारांना स्पर्श होऊन अनेकांचा जीव गेल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. या अपघातात झालेले नुकसान न भरून निघणारे आहेत.
ठळक मुद्देमहावितरणचे आवाहन : धोका टाळण्यासाठी सावध राहणे गरजेचे