कपिल केकत ल्ल गोंदियावीज चोरीच्या प्रकारांवर आळा घालण्यासाठी आता महाराष्ट्र वीज वितरण कंपनी अंडरग्राऊंड (भूमिगत) व एबी (एरियर बंच) केबलच्या माध्यमातून वीज पुरवठा करणार आहे. केंद्र शासनाच्या एकात्मिक उर्जा विकास योजनेंतर्गत (आय.पी.डी.एस.) प्राथमिक स्तरावर विभागाने गोंदिया व तिरोडा या शहरांची त्यासाठी निवड केली आहे. मुख्यालयाकडून कार्यादेश येताच यावर कार्य केले जाणार असल्याची माहिती आहे. पूर्व विदर्भात गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक वीज चोरी होत असल्याची नोंद आहे. वीज चोरी पकडण्यासाठी किंवा थकबाकीची वसूली करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना मारहाण व शिवीगाळ करण्याचे प्रमाण जास्त आहे. शिवाय मनुष्यबळाची कमतरता असल्याने दैनंदिन कामात महावितरण कमकुवत पडत आहे. यामुळे वीज चोरीचे प्रमाण काही केल्या कमी होत नसल्याचे दिसत आहे. यामध्ये आकडे घालून होणारी वीज चोरी ही उघड बाब आहे. वीज चोरीच्या या प्रकारांवर आळा घालण्यासाठी आता महावितरणने कठोर पाऊल उचलून वीज चोरांवर कारवाईसुद्धा करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा वीज चोरीवर पाहिजे त्या प्रमाणात परिणाम झाला नाही. या प्रकारावर आळा घालण्यासोबतच शहरातील विस्कटलेले वीज वितरणाचे जाळ सुरळीत करण्यासाठी महावितरणने अंडरग्राऊंड (भूमिगत) केबल टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या ठिकाणी अंडरग्राउंड केबल टाकता येणार नाही, अशा भागात एबी केबलच्या (एरियर बंच) माध्यमातून वीज पुरवठा केला आहे. पाच महिन्यांपूर्वी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतचे सुतोवाच करून ही योजना मंजूर करीत असल्याचे सांगितले होते.केंद्र शासनाच्या एकात्मिक उर्जा विकास योजनेंतर्गत येथून मुख्यालयाला व तेथून शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला जवळ-जवळ मंजुरी मिळाली असून लवकरच मुख्यालयाकडून कार्यादेश आल्यावर ही कामे सुरू होणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता कबीरदास चव्हाण यांनी दिली. असे आहे अंडरग्राऊंड व एबी केबल४अंडरग्राऊंड (भूमिगत) न एबी केबल ही दोन कामे महावितरण करणार आहे. यात अंडरग्राऊंड केबल अंतर्गत चार किलोमीटर नवीन उच्चदाब भूमिगत वाहिनी व १० किलोमीटर लघुदाब भूमिगत वाहिनी टाकली जाणार आहे. अंडरग्राऊंड केबलमध्ये जमिनीच्या आतून केबल टाकले जाणार आहेत. जेणेकरून आकडे लावण्याचा प्रकार बंद होऊन कुणालाही वीज चोरी करता येणार नाही. ४एबी केबल हे विशिष्ट प्रकारचे केबल आहे. या केबलच्या आतमध्ये वीज पुरवठा करणारे तार राहणार असून त्यावर कोट राहणार नाही. म्हणजेच जीवंत वीज तार केबलच्या आत राहिल्याने त्यावर आकडा घालता येणार नाही. गोंदिया शहरात १४ किलोमीटर तर तिरोडा शहरात आठ किलोमीटर केबल टाकण्याचे नियोजन करण्यात आले आहे.दोन्ही शहरांसाठी १८.३८ कोटी ४केंद्र शासनाच्या एकात्मिक उर्जा विकास योजनेंतर्गत जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा या दोन शहरांची निवड करण्यात आली आहे. यासाठी येथून पाठविण्यात आलेल्या प्रस्तावात गोंदियासाठी १८ कोटी ३८ लाख रूपयांची तर तिरोडासाठी ९ कोटी ८२ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्राथमिक स्तरावर या दोन शहरांत ही योजना राबविली जाणार असून त्यानंतर जिल्ह्यात या योजनेंतर्गत विविध कामे केली जाणार आहेत. नवीन उपकेंद्रही उभारणार४वितरण जाळयांचे सक्षमीकरण, ग्राहकांना वीज मिटर देणे, तांत्रिक व व्यवसायिक हानी कमी करणे या उद्देशातून केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत फक्त केबलची कामेच होणार नसून अन्य विविध कामे केली जाणार आहेत. यामध्ये अंडरग्राऊंड व एबी केबलसह तीन नवीन उपकेंद्र उभारले जाणार आहे.
गोंदिया-तिरोड्यात अंडरग्राऊंड वीज पुरवठा
By admin | Published: January 05, 2016 2:18 AM