लोकमत न्यूज नेटवर्कसुकडी डाकराम : केंद्रीय राज्यमंत्री हेडगे यांच्या वक्तव्याचा निषेध करून त्यांना पदावरून हटविण्याबाबतचे निवेदन तिरोडा काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाच्या वतीने तहसीलदार तिरोडा यांना देण्यात आले.केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेडगे यांनी आपल्या वक्तव्यातून ‘माणसाची ओळख त्याच्या जाती व धर्माच्या आधारावर व्हावी तसेच भारतीय जनता पक्ष संविधान बदलविण्यासाठी सत्तेमध्ये आला आहे’ असे बोलून दाखविले. त्यांच्या या व्यक्तव्याचा निषेध महाराष्ट्र काँग्रेस कमेटीचे (अनुसूचित जाती विभाग) अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात तीव्र निषेध करण्यात आला. देशातील अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्यांक व बहुजनांच्या भावना त्यांच्या वक्तव्यामुळे दुखावल्या आहेत. त्यांचे वक्तव्य लोकशाहीला घातक आहे. त्यामुळे त्यांना केंद्रीय खात्यातून तत्कार हटविण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन तिरोडा काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाने तहसीलदारांना राष्टÑपतींच्या नावे दिले आहे.निवेदन देतेवेळी तिरोडा काँग्रेस कमिटीचे (अनुसूचित जाती विभाग) अध्यक्ष हितेंद्र जांभूळकर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे (अ.जा.विभाग) अध्यक्ष विशाल शेंडे व काँग्रेस पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय राज्यमंत्री हेडगे यांच्या वक्तव्याचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:27 AM
केंद्रीय राज्यमंत्री हेडगे यांच्या वक्तव्याचा निषेध करून त्यांना पदावरून हटविण्याबाबतचे निवेदन तिरोडा काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाच्या वतीने तहसीलदार तिरोडा यांना देण्यात आले.
ठळक मुद्देपदावरून हटवा : तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन