मागील वर्षी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या टाळेबंदीत सर्वांचेच मोेठे नुकसान झाले आहे. त्यात शैक्षणिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले. आता कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने राज्यात टाळेबंदी लागू केली आहे. त्यामुळे शैक्षणिक कार्य ठप्प असून, विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यातच अनेकांच्या पालकांचे रोजगारही हिरावले गेले आहेत. त्यामुळे आभासी पद्धतीने होणाऱ्या परीक्षा देण्यासही विद्यार्थी असमर्थ ठरत आहेत. त्यामुळे विद्यापीठाने उन्हाळी परीक्षेचे परीक्षा शुल्क माफ करावे, ज्या परीक्षा झाल्या नाहीत, त्याचे परीक्षा शुल्क परत करावे, आभासी परीक्षेच्या वेळेस येणाऱ्या तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी विद्यापीठाने एकाच वेळी सर्व विद्यार्थ्यांची सामूहिक परीक्षा घ्यावी. विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू करावा, तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यापीठाने आभासी शिबिरांचे आयोजन करावे, असे निवेदनात नमूद आहे. हे निवेदन अभाविपच्या सडक अर्जुनी शाखेचे नगरमंत्री रमेश लांजेवार व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, तसेच विद्यापीठाकडे ई-मेलद्वारे पाठविले आहे.
विद्यापीठाने परीक्षा शुल्क माफ करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 4:21 AM