तत्पूर्वी सरपंचपदाकरिता संगीता अशोक रिनाईत व शालू मुन्नीलाल चौधरी तर उपसरपंचपदाकरिता एकच वर्षा देवेंद्र अंबुले यांनी नामांकन अर्ज सादर केला. संगीता रिनाईत यांनी वेळेवर नामांकन मागे घेतल्याने शालू चौधरी यांचा मार्ग मोकळा झाला. सरपंचपदी चौधरी तर उपसरपंचपदी अंबुले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संगीता संजय वरठी, शबनम खालीकभाई पठाण, वहिदा हमजभाई शेख, अजाबराव सूरजलाल रिनाईत, राकेश केशोराव बिसेन, शुभम हरबा बोदेले, जगजीवन अनंतराम वधारे उपस्थित हाेते. तर संगीता रिनाईत व मंजू ईश्वर पटले, दीपक भुवनलाल रिनाईत हे निवडप्रक्रिया पूर्ण होण्याआधीच सभागृहाबाहेर निघून गेले. अध्यासी अधिकारी व्ही. जे. कठाणे यांना देवेंद्र भगत, तलाठी ग्रामविकास अधिकारी ओ.एम. तूरकर यांनी यांच्याकडून निवडणूककामी साहाय्य केले.
एकोडी येथे सरपंच, उपसरपंच बिनविरोध निवड ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 4:27 AM