गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे गोंदिया जिल्ह्याचे प्रमुख पीक असलेल्या भात पिकाला सर्वात जास्त हानी पोहोचली असून या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी शेतामध्ये पुंजणे आणि धान कापून ठेवले होते. मात्र, अवकाळी पावसाने या धान पिकाला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
याविषयी पंचनामे कृषी विभाग, महसूल विभाग आणि ग्रामसेवक यांच्या द्वारा करण्यात आले असून गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यामधील जवळपास 22 हजार शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे. याविषयी अहवाल तयार करून शासन स्तरावर आणि प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेला आहे. त्यानुसारचं शेतकऱ्यांना पीक विमा कंपनी रक्कम आणि शासन भरपाई देणार असल्याचे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी सांगितले आहे.