अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात खरीप हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या एकूण ६६ केंद्रावरून शासकीय धान खरेदी सुरू आहे. मात्र बऱ्याच केंद्रावर सावळा गोंधळ सुरू असून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. हा मुद्दा लोकमतने लावून धरल्यानंतर शासनाने याची चौकशी करण्यासाठी फेडरेशनच्या मुंबई आणि पुणे येथील तीन भरारी पथक जिल्ह्याच्या दौऱ्यावर पाठविले होते. या पथकाने ३ ते १३ फेब्रुवारी दरम्यान प्रत्त्यक्ष केंद्राना भेटी देऊन वस्तू स्थिती जाणून घेतली. या दरम्यान पथकाला बऱ्याच शासकीय केंद्रावर अप्रमाणित वजन काटे आढळल्याची माहिती आहे.जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या शासकीय धान खरेदी केंद्रावरील अनागोंदी कारभाराला घेऊन यंदा सुरूवातीपासूनच शेतकऱ्यांची ओरड सुरू होती. केंद्रावर शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांचा माल अधिक खरेदी केली जात असल्याचा आरोप केला जात होता. धान खरेदी केंद्रावर इलेक्ट्रानिक वजन काट्यावर धान खरेदी करण्याचे निर्देश असताना याचे पालन केले जात नव्हते. धान खरेदीसाठी मार्केटिंग फेडरेशनला काही नियम लागू केले आहे. त्यात शासकीय धान खरेदी केंद्रावर सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे, शेतकऱ्यांकडून हेक्टरी किती क्विंटल धान खरेदी करायची, व्यापाऱ्यांकडून तर धानाची खरेदी करण्यात येऊ नये आदी गोष्टींचा समावेश आहे. मात्र बहुतेक केंद्रावर या नियमांचे पालन केले जात नसल्याचे चित्र होते. तर काही केंद्रावर अप्रमाणीत वजन काट्यावर धान खरेदी सुरू होती. लोकमतने सुध्दा स्टिंग आॅपरेशन करुन ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर याची शासनाने गांर्भियाने दखल घेत याची चौकशी करण्यासाठी मुंबई, पुणे येथील आठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेले तीन भरारी पथक तयार केले होते. या भरारी पथकाने ३ ते १३ फेब्रुवारी दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील सर्वच शासकीय धान खरेदी केंद्राना भेटी देऊन तपासणी केली. या पथकाला काही केंद्रावर अप्रमाणीत वजन काटे, फाटलेला बारदाना, मोठ्या प्रमाणात धान उघड्यावर ठेवलेला आणि धानाच्या साठवणुकीची व्यवस्था नसल्याचे आढळले. तर काही केंद्रावर शेतकऱ्याकडून धान खरेदी करण्यासाठी ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक धान खरेदी करण्यात आल्याची बाब पुढे आली. काही केंद्रावर मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळल्याचे पथकातील अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.फेडरेशनच्या महासंचालकांना देणार अहवालतीन वेगवेगळ्या भरारी पथकाने जिल्ह्यातील शासकीय धान खरेदी केंद्राना भेटी देऊन पाहणी केली. यात अनेक धान खरेदी केंद्रावर अनियमितता आढळली. याचा संपूर्ण अहवाल या पथकाने तयार केला असून शनिवारी हा अहवाल मार्केटिंग फेडरेशनचे मुंबई येथील महासंचालक यांना अहवाल सोपविणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.अहवालानंतर कार्यवाहीकडे लक्षधान खरेदी केंद्राची तपासणी करण्यासाठी पथकाने अहवाल तयार करुन आपला अहवाल शनिवारी महासंचालकांकडे सोपविणार आहे. त्यामुळे पथकाने ज्या केंद्रावर अनियमितता आढळल्याचा ठपका ठेवला आहे. त्यांच्यावर नेमकी कुठली कारवाही केली जाते याकडे लक्ष लागले आहे.
अनेक धान खरेदी केंद्रावर अप्रमाणित वजन काटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 6:00 AM
जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या शासकीय धान खरेदी केंद्रावरील अनागोंदी कारभाराला घेऊन यंदा सुरूवातीपासूनच शेतकऱ्यांची ओरड सुरू होती. केंद्रावर शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांचा माल अधिक खरेदी केली जात असल्याचा आरोप केला जात होता. धान खरेदी केंद्रावर इलेक्ट्रानिक वजन काट्यावर धान खरेदी करण्याचे निर्देश असताना याचे पालन केले जात नव्हते.
ठळक मुद्देभरारी पथकाच्या पाहणीत उघड : आज सोपविणार महासंचालकांना अहवाल