लसीकरणासाठी आरोग्य विभागाचे ढिसाळ नियोजन.
ग्रामीण भागात लसीकरणासाठी गोंदियावासीयांची गर्दी करत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण लोक मात्र ऑनलाईनअभावी लसीकरणापासून वंचित राहण्याचा प्रकार सध्या तालुक्यात पाहायला मिळत आहे. लिंक केव्हा सुरू होते कसे रजिस्ट्रेशन करावे याविषयी गावातील नागरिकांना माहिती नसल्यामुळे गावखेड्यातील बरेच नागरिक कोविड लसीकरणापासून दूर आहेत.
तालुक्यातील सात केंद्रावर आजघडीला कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे पण या केंद्रावर गावातील नागरिक कमी आणि शहरातील नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे गावखेड्यातील सर्वसामान्य जनता मात्र त्रस्त झाली आहे तर अनेकांनी प्रशासनाच्या या ढिसाळ नियोजनाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.