शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

५३ लाख युनिट्सने वापर वाढला

By admin | Published: April 11, 2015 1:48 AM

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात वीज वापरात ५३ लक्ष युनिट्सची वाढ झाल्याची माहिती आहे. सुखसुविधेच्या विद्युत

एसी-कुलर सुरू : देवरी विभागात होतो सर्वाधिक विजेचा वापरकपिल केकत ल्ल गोंदियामागील वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात वीज वापरात ५३ लक्ष युनिट्सची वाढ झाल्याची माहिती आहे. सुखसुविधेच्या विद्युत उपकरणांचा वापर वाढत चालल्याचा हा परिणाम आहे. उन्हाळ््यात एसी, कुलर व पंख्यांचा वापर जास्त होत असल्याने वीजेच्या वापरात भर पडत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात नोंद करण्यात आलेल्या वीज वापराच्या या वाढीत देवरी विभागात ३७ लक्ष युनिट्सची वाढ दिसून येत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या या दुनियेत मानवाला गरज पडेल त्या वस्तूची निर्मिती केली जात आहे. यात विद्युत उपकरणांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. थंडीत उष्णता निर्माण करण्यासाठी बुलोवर तर उन्हाळ््यात गारवा निर्माण करण्यासाठी एयर कंडीशनर, कुलर व पंखे आदी विद्युत उपकरण उलपब्ध आहेत. एवढेच नाही तर स्वयंपाकात पोळ््या बनविण्यापासून तर विजेवर चालणारी वाहनेही आता बाजारात उपलब्ध आहेत. यंत्र व उपकरणांच्या माध्यमातून मानवाला सुखसुविधा मिळत असतानाच त्यांची अजून मागणी वाढतच चालली आहे. आजघडीला माणसाला दररोजच्या उपयोगात येणाऱ्या उपकरणांमधील सर्वाधिक उपकरणे विजेवर चालणारी आहेत. यामुळेच विजेचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यात उन्हाळा, हिवाळा व पावसाळा या तिनही ऋतूंत विजेचा वापर काही केल्या कमी होत नसल्याचे बघावयास मिळते. याबाबत वीज वितरण कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, मार्च २०१३ ते फेब्रुवारी २०१४ या काळात ४१४.७८ लक्ष युनिट्स विजेचा जिल्ह्यात वापर करण्यात आला होता. तर यंदा त्यात भर पडली असून हा आकडा ४६७.७६ लक्ष युनिट्सवर गेला आहे. म्हणजेच मागील वर्षीच्या तुलनेत विजेच्या वापरात जिल्ह्यात ५३ लक्ष युनिट्सची भर पडली आहे. जिल्ह्यात विद्युत वितरण कंपनीचा कारभार गोंदिया व देवरी या दोन विभागांतून चालतो. त्यामुळे वीज वापराच्या आकडेवारीबाबत विभाग निहाय जाणून घेतले असता गोंदिया विभागात मागील वर्षी म्हणजेच मार्च १३ ते फेब्रुवारी २०१४ या काळात २६१.७१ लक्ष युनिट्सची नोंद आहे. यावर्षी त्यात वाढ झाली असून हा आकडा २७७.७८ लक्ष युनिट्सवर पोहचला आहे. म्हणजेच गोंदिया विभागात १६.०७ ल.यु.विजेचा वापर वाढला आहे. देवरी विभागात मागील वर्षी १५३.०७ ल.यु. वीज वापर करण्यात आला होता. यंदा मात्र १८९.९८ ल.यु.वीज वापराची नोंद असून ३६.९१ ल.यु.वीज वापर वाढल्याची नोंद करण्यात आली आहे. गोंदियाच्या शहरी भागात मागील वर्षी ६०.३४ ल.यु.वीज वापर करण्यात आला होता. यंदा ६४.०९ ल.यु. वीज वापराची नोंद महावितरणने घेतली आहे.भारनियमन झालेच नाहीउत्पादनापेक्षा जास्त वीजेची मागणी असल्यास अशा परिस्थितीत वीज वितरण कंपनीला भारनियमन करावे लागते. त्यातही आता ज्या परिसरात वीज चोरीचे प्रमाण जास्त व कंपनीला मिळणारे उत्पन्न कमी आहे त्या परिसरातच भारनियमन करावे, असे निकष कंपनीने ठरविले आहे. यासाठी कंपनीने ए, बी, सी, डी, ई, एफ व जी असे गट मांडले आहेत. निकषानुसार ‘जी’ या गटात सर्वाधिक भारनियमनाचा कालावधी ठरविण्यात आला असून लोड मॅनेजमेंट सेल (मुंबई) यांच्या निर्देशावरून भारनियमन केले जाते. यंदा उत्पादनाच्या तुलनेत मागणी कमी असल्याने जिल्ह्यात आतापर्यंत भारनियमन करण्यात आले नसल्याचे वीज वितरण कंपनीकडून सांगण्यात आले.‘जी’ गटात सर्वाधिक भारनियमनवीज वितरण कंपनीने भारनियमनासाठी तयार केलेल्या विविध गटांसाठी भारनियमनाचा कालावधी ठरविलेला आहे. यातील ‘जी’ या गटात सर्वाधिक भारनियमन करावयाचे असून या गटातही आणखी तीन उपगट करण्यात आले आहेत. त्यांना जी-१, जी-२ व जी-३ म्हणून संबोधले जाते. या उपगटांत जिल्ह्यातील रतनारा, सोनेगाव (परसवाडा) हिरडामाली व मुंडीपार (गोरेगाव) या क्षेत्रांचा समावेश आहे. मात्र लोड मॅनेजमेंट सेलकडून अद्याप तरी या गटात भारनियमनाचे निर्देश देण्यात आले नसल्याने या गटाला भारनियमनापासून तूर्त दिलासा मिळाला आहे.