चौकशीची मागणी : मजूर कामापासून वंचित लोकमत न्यूज नेटवर्क बोंडगावदेवी : गावातील मजुरांना गावामध्ये वर्षभरातून कमीत कमी १०० दिवस रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. मात्र गावपातळीवरील संबंधित पदाधिकारी मग्रारोहयोच्या कामावर मजूर वर्गाला डावलून मोठ्या प्रमाणात यंत्रांचा वापर करुन काम करवून घेत असल्याचा प्रकार ताडगाव ग्रामपंचायत करीत असल्याची लेखी तक्रार तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते अरविंद पालीवाल यांनी केली आहे. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ताडगाव ग्रामपंचायतच्यावतीने पांदन रस्त्याचे काम केले जात आहे. मात्र सदर पांदण रस्त्याच्या कामावर गावातील मजुरांकडून काम केले जात नसून तेथे जेसीबी सारख्या यंत्राणे काम केले जात असल्याचे प्रकार सुरू आहे. या संबंधीची तक्रार सामाजिक कार्यकर्ता पालीवाल यांनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी, तहसीलदार, खंड विकास अधिकारी यांच्याकडे केली आहे. तसेच या प्रकाराची चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याची मागणीही पालीवाल यांनी केली अधिकाऱ्यांकडे आहे.
मग्रारोहयोच्या कामावर यंत्रांचा वापर
By admin | Published: June 24, 2017 1:56 AM