लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भारत हा कृषीप्रधान देश असून ६० टक्के नागरिक शेतीवर अवलंबून आहेत. विविध भागात विविध प्रकारचे पीक घेतले जातात. विविध पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना पोशिंदा म्हटले जाते. त्याला सोबती म्हणून सतत बैलजोडी असायची. परंतु आधुनिकीकरणामुळे बैलजोड्यांची संख्या आता कमी होऊन धानाच्या कापणी व मळणीकरिता यंत्रांच्या मागणीत आता वाढ झाली आहे.पूर्वी शेतकऱ्यांना पेरणीपासून मळणीपर्यंत बैलजोडीची गरज मोठ्या प्रमाणात भासत होती. प्रत्येक शेतकºयाकडे गोधन मोठ्या प्रमाणात असायचे. घरोघरी दूध, दही व तूप भरपूर प्रमाणात उपलब्ध होत असे. कुटुंबात शेतीसाठी बैल असायचे. पण आता सर्वत्र देशी गायी पाळण्याचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे.गावरान गाईच्या तुलनेत अधिक दूध देणाऱ्या जर्सी होलस्टीन क्राईनखिस मुर्रा म्हैस अधिक नफा मिळविण्याच्या हेतूने शेतकरीबांधव पाळत आहेत. धान पिकांची कापणी मळणी झाल्यानंतर शेतात गुरेढोरे चारण्याकरिता भरपूर मोकळी जागा असायची. परंतु आता सर्वत्र मोकळ्या जागांवर अतिक्रमण झाले आहे. मोकळ्या जागा लोकांनी गिळंकृत केली आहे.अनेक ठिकाणी सिंचनाची सोय उपलब्ध झाल्याने वर्षातून दोन-तीनदा पीक घेतले जातात. त्यामुळे गुरांना चारण्याचा प्रश्न निर्माण झाला. खेड्यातील गोधन झपाट्याने कमी झाले व म्हशींची संख्या रोडावली. त्यामुळे शेतीसाठी उपयोगी बैलांची संख्या कमी झाली व यंत्रांची मागणी वाढली आहे.ट्रॅक्टरने नांगरणी आणि वखरणी करून शेतात पेरणी केली जाते. सध्या शेतकरी मळणीसाठी बैलबंडी सोडून थ्रेसर ट्रॅक्टर मशिनचा उपयोग करीत आहेत.बैलांद्वारे धानाची मळणी केल्यास अधिक वेळ खर्च होतो. त्यातच मजुरांचा खर्चही अधिक. त्यामुळे आज शेतकरी यांत्रिक शेतीकडे वळले आहेत. गोंदिया जिल्ह्यात धानाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. धानाच्या मळणीच्या कामासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना अडचणीला तोंड द्यावे लागते.त्यामुळे बरेच शेतकरी मळणी यंत्राने धान, गहू, हरभरा व इतर पीक शेतातून काढत आहेत. कमी वेळात लवकर धान्य तयार होत असल्याने डिझेल किंवा विजेवर चालणाºया मळणी यंत्रांकडे शेतकºयांचा अधिक कल दिसून येत आहे. धान्य शेतकरी आता थेट बाजारात विकत आहेत.
शेतीसाठी आधुनिक यंत्राचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2018 11:43 PM
भारत हा कृषीप्रधान देश असून ६० टक्के नागरिक शेतीवर अवलंबून आहेत. विविध भागात विविध प्रकारचे पीक घेतले जातात. विविध पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना पोशिंदा म्हटले जाते. त्याला सोबती म्हणून सतत बैलजोडी असायची.
ठळक मुद्देमजुरांची कमतरता : बैलजोड्यांची संख्या घटली