शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

रिक्तपदांमुळे आरोग्य विभागच आजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2021 5:00 AM

२६१ रिक्त पदे मागील २०१६ च्या आधीपासूनच रिक्त असल्यामुळे आरोग्य सेवा प्रभावित झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विषाणू संक्रमणाचा धोका कायम आहे. अशात देखील जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्यामुळे त्याचा परिणाम नागरिकांच्या उपचारावर होत आहे. अडीचशेपेक्षा जास्त पदे रिक्त असल्यामुळे आरोग्य यंत्रणाच आजारी पडली असल्याने अशात सर्वसामान्यांच्या उपचाराचे काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  ज्या डॉक्टरांच्या माध्यमातून रुग्णांवर औषधोपचार केला जातो. त्यांचीच पदे मागील पाच-सहा वर्षांपासून रिक्त आहेत. अ श्रेणीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ७१ पदांपैकी १० पदे रिक्त आहेत. ब श्रेणीच्या ५४ पदांपैकी डॉक्टरांची १० पदे रिक्त आहेत. डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने आरोग्य विभागच आजारी पडला असून त्याचा रुग्णसेवेवर सुद्धा परिणाम होत आहे.कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज व्यक्त केला जात असून आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना केल्या जात आहेत. पण आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त असल्याने तिसऱ्या लाटेचा सामना कसा करणार असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. जिल्हा आरोग्य विभागात जिल्हा आरोग्य अधिकारी १ पद, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी, अ श्रेणीचे ७१ वैद्यकीय अधिकारी, ब श्रेणीचे ५४ आरोग्य अधिकारी, १७ आरोग्य पर्यवेक्षक, ४४ औषधी निर्माते, १७ प्रयोगशाळा वैज्ञानिक, ६४ आरोग्य सहायक, १९६ आरोग्यसेवक, ४० आरोग्य सहायिका, ३६६ आरोग्यसेविका, ३ कुष्ठरोग तज्ज्ञ व ४० स्वच्छता कामगार या प्रकारे अ ते ड श्रेणीपर्यंत ९१५ पदांना मंजुरी देण्यात आली आहे, परंतु प्रत्यक्षात ६५४ पदेच भरण्यात आली आहेत. २६१ रिक्त पदे मागील २०१६ च्या आधीपासूनच रिक्त असल्यामुळे आरोग्य सेवा प्रभावित झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विषाणू संक्रमणाचा धोका कायम आहे. अशात देखील जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्यामुळे त्याचा परिणाम नागरिकांच्या उपचारावर होत आहे. अडीचशेपेक्षा जास्त पदे रिक्त असल्यामुळे आरोग्य यंत्रणाच आजारी पडली असल्याने अशात सर्वसामान्यांच्या उपचाराचे काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

 २६१ पदांची अद्यापही भरती नाही- जिल्हा परिषद गोंदियाच्या आरोग्य विभागांतर्गत अनेक वर्षांपासून २६१ पदांची भरती करण्यात आली नाही. त्यामुळे वेळेवर रुग्णांना आरोग्य सेवा उपलब्ध होत नाही. तसेच परिसरामध्ये घाणीचे वातावरण कायम आहे. या सर्व प्रकारामुळे आरोग्य सेवा प्रभावित झाली आहे. जि.प. गोंदियाच्या आरोग्य विभागांतर्गत जिल्ह्यात ४० प्राथमिक आरोग्य केंद्र व २५६ उपकेंद्र संचलित आहेत. १३ लाखांपेक्षा अधिक नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी या शासकीय आरोग्य केंद्रांवर आहे. शासनाने रुग्णांना सेवा देण्यासाठी एक जिल्हा आरोग्य अधिकारी, एक अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी व डॉक्टरांची २० पदे रिक्त आहेत.