केंद्र सरकारने १६ जानेवारीपासून देशव्यापी लसीकरण मोहीम सुरू केली आहे. कृतिदल तसेच वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ४५ वर्षे वयावरील सर्व व्यक्तींना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वांनी या लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा असे समाजसेवक संजय राहांगडाले यांनी यावेळी सांगितले. वारंवार हात धुणे आणि सॅनिटायझरचा वापर करणे व सामाजिक अंतर ठेवणे आदीची माहिती देण्यात आली. लय, ताल, कृतीच्या माध्यमाने लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती तिरोडा माजी सभापती वाय.टी. कटरे, पोलीसपाटील युवराज टेंभरे, उपसरपंच पटले, कमल ठाकरे, ग्रा.पं. सदस्य रहांगडाले, शीला बिसेन, अजय सदरे, प्रशांत गौतम, विलास डोंगरे, सुजित पवार, मुख्याध्यापक संजय मडावी, शिक्षक, अंगणवाडी व आशासेविका उपस्थित होत्या.
खैरबोडी येथे लसीकरण जनजागृती ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 4:31 AM