शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
5
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
6
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
7
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
8
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
9
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
10
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
11
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
12
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
13
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
14
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
16
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
17
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
18
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
19
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
20
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'

३.५० लाख जनावरांना दिली लाळखुरकत लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 6:00 AM

या आजारामध्ये तोंड व खुरात जखमा होतात, जनावर चारा खाणे बंद करतात, तोंडातून लाळ गळते, जनावर चालताना लंगडते, ताप येतो, थकवा जाणवतो, धाप लागते अशा प्रकारची लक्षणे दिसतात. वेळीच उपचार न झाल्यास जनावर मृत्युमुखी पडते. बाहेरच्या राज्यातून व बाहेरच्या जिल्ह्यातून धान हंगामासाठी जनावरांचे स्थलांतर होते. अशा स्थलांतरीत जनावरांमुळे या रोगाची लागण होण्याची शक्यता जास्त वाढते.

ठळक मुद्दे१४ वी फेरी राबविली : जिल्हाभरात मिळाला प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जनावरांमध्ये आढळणाऱ्या लाळखुरकत या संसर्गजन्य गंभीर आजाराच्या निर्मूलनासाठी जिल्हा परिषदेच्या जिल्हा पशुसंवर्धन विभागातर्फे लाळखुरकत रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमेची १४ वी फेरी राबविण्यात आली आहे. हे लसीकरण संपूर्ण राज्यात एकाच वेळी मोहीम स्वरूपात राबविण्यात आले आहे. ३० आॅक्टोबरपासून राज्यात ही मोहीम पशुसंवर्धन विभागातंर्गत सुरू झाली असून, २९ नोव्हेंबरपर्यंत राबविण्यात आली आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील तीन लाख ५० हजार ७०८ जनावरांना लस देण्यात आली आहे.गोंदिया जिल्ह्यात गाय व म्हशींची एकूण संख्या चार लाखांच्या घरात आहे. लाळखुरकत हा गंभीर आजार असून, यालाच लाळे, पायखुरी व तोंडखुरी असेही म्हटले जाते.या आजारामध्ये तोंड व खुरात जखमा होतात, जनावर चारा खाणे बंद करतात, तोंडातून लाळ गळते, जनावर चालताना लंगडते, ताप येतो, थकवा जाणवतो, धाप लागते अशा प्रकारची लक्षणे दिसतात. वेळीच उपचार न झाल्यास जनावर मृत्युमुखी पडते. बाहेरच्या राज्यातून व बाहेरच्या जिल्ह्यातून धान हंगामासाठी जनावरांचे स्थलांतर होते. अशा स्थलांतरीत जनावरांमुळे या रोगाची लागण होण्याची शक्यता जास्त वाढते. यातून शेतीबरोबर दुग्ध व्यवसायासही मोठे आर्थिक नुकसान होते.या रोगाला पायबंद घालण्यासाठी लसीकरण हा एकमेव खात्रीशीर उपाय असल्याने जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत संपूर्ण जिल्ह्यात ३० आॅक्टोबरपासून ही मोहीम राबविण्यात आली आहे. जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या श्रेणी-१ व २ च्या सर्व दवाखान्यांत लाळ्या खुरकतची लस उपलब्ध करविण्यात आली होती. जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ. राजेश वासनिक व उपायुक्त डॉ. संजय गायगवळी यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम राबविण्यात आली. राज्य पशुसंवर्धन विभागाकडून ७१ हजार ५५६ तर जि.प.च्या पशु संवर्धन विभागाकडून दोन लाख ७९ हजार १५२ जनावरांचे जनावरांचे लसीकरण करण्यात आले. यात, गोंदिया तालुक्यात २३ हजार ३१७, तिरोडा तालुक्यात १६ हजार १८३, आमगाव तालुक्यात सात हजार ६७३, देवरी तालुक्यात १९ हजार ५७८, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात चार हजार ८०५ अशा एकूण तीन लाख ५० हजार ७०८ जनावरांचे लसीकरण करण्यात आले. 

टॅग्स :doctorडॉक्टर