परसवाडा : तिरोडा तालुक्यातील इंदोरा बु. प्राथमिक आरोग्य केंद्रात व उपकेंद्राअंतर्गत कोरोना संक्रमण लसीकरण मोहीम व आरटीपीसीआर चाचणी शिबिर व जनजागृती करण्यात येत असून, कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मिशन सुरू आहे. यासाठी सर्वप्रथम ज्येष्ठ नागरिक, युवक वर्गानेही समोर येऊन प्रत्येक घरातील ४५ वर्षांवरील पुरुष, महिलांनी लस घेणे ही काळाची गरज आहे, असे आवाहन इंदोरा बु. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी एस. सी. हरिणखेडे यांनी केले आहे.
कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी ग्रामस्थांनी कोरोना तपासणी करण्यासाठी बिनधास्त पुढे यावे, मनात शंका ठेवू नका, लक्षणे दिसताच वेळीच डॉ. सल्ला घेऊन तपासणी केल्यास उपचार करणे सोयीस्कर होते, प्रत्येकाने आपली प्रतिकारशक्ती वाढवावी, कोरोनावर मात करण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्यावी व सजग राहून घरामध्ये सुरक्षित राहावे असे डॉ. हरिणखेडे यांनी सांगितले. कोविड लसीकरणाचे गावनिहाय लाभार्थीचे वय ४५ ते ५९ व ६० च्यावर संख्या इंदोरा बु. ८७६, बिहीरीया ५३०, करटी खु. ४५६, चांदोरीटोला १९४, चांदोरी खुर्द ३४५, पिपरीया २१९, खैरलांजी ३३९, परसवाडा ५३८, बघोली २७५, अर्जुनी १०८२, सावरा २४४, बोंडरानी २३, गोंडमोहाडी ७२१, बोरा ५१२, किंडगीपार १६९, बोदा ४९३, गोमाटोला १५०, सोनेगाव ३३३, अत्री ४४०, सेजगाव ६३१, सेजगावटोला १०६, बिबीटोला ५९, नहरटोला १०६, डब्बेटोला ३२५, बेरडीपार ७९९, जमुनीया ३०२, सिंधीटोला ११३, करटी बु. ७१०, पालडोंगरी ५५७, भुराटोला १६३, कवलेवाडा १०४८, मरारटोला ५४४, पुजारीटोला २४१, चिरेखनी ७६० एकूण १४५३३ लाभार्थी लसीकरणासाठी पात्र आहेत. १६ एप्रिलला लसीकरणासाठी १६५० डोसेस प्राप्त झाले. कवलेवाडा उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारी एस. सी. हरिणखेडे यांच्या मार्गदर्शनात आरोग्य सेविका एम. डी. वलथरे, अर्जुनी केंद्रात ए. डी. पटले, इंदोरा प्रा. आरोग्य केंद्रात सी. बी. भगत, एस. एम. कुरैशी, एस. बी. रहांगडाले, ए. पी. कांबळे हे नागरिकांना लसीकरणाची सेवा देत आहेत.