लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : ग्रामीण विकासात स्थानिक स्वराज्य संस्था राजकारणाच्या पलीकडे जाऊन विकासाची मुहूर्तमेढ रोवत आहे. लोकसहभागाच्या सकारात्मकतेमुळे स्वत:चे गाव स्वराज्य संकल्पनेतून ‘स्मार्ट गाव’ ठरू शकते. असे ध्येय वळद ग्रामपंचायतने बाळगले आहे. वळद ग्रामपंचायतच्या ध्येयाची दखल घेत नरेगाच्या राष्ट्रीय समितीला या स्मार्ट ग्रामचे वेध लागले आहे. ग्रामपंचायतने नरेगा अंतर्गत विविध विकासात्मक कामांना गती दिली आहे.वळद येथील सरपंच किशोर रहांगडाले व सचिव शैलेश परिहार व ग्रामपंचायत सदस्यांनी गाव विकासात नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग घेत स्मार्ट ग्रामची संकल्पना राबविली. गाव विकासाचे ध्येय बाळगून विविध योजनांच्या माध्यमातून गावाला स्मार्ट ग्राम करण्यासाठी ग्रामपंचायतच्या पदाधिकारी व सदस्यांची धडपड सुरू आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत वळद ग्रामपंचायतने विकासात्मक प्रस्ताव नियोजनाचा आराखडा तयार केला. या नियोजनाला शासन स्तरावर यशस्वी प्रारुप मिळावे. यासाठी सरपंच किशोर रहांगडाले यांनी पुढाकार घेतला. या प्रस्तावाला खंडविकास अधिकारी एस.एम. पांडे, सहायक गटविकास अधिकारी एल.एम. कुटे, के. एम.रहांगडाले यांनी मंजुरी दिली. त्यामुळे वळद येथील विकासात्मक कामांना गती मिळण्यास मोठी मदत झाली. वळद ग्रामपंचायतने सर्वकश प्रस्तावाचे नियोजन केल्याने नरेगा अंतर्गत कामांना गती मिळाली आहे. स्मार्ट ग्रामच्या वाटचालीत ग्रामपंचायतच्या माध्यमातून लोकसहभागातून गावातील तलावाचे खोलीकरण करण्यात आले. त्यामुळे सिंचनाची सोय होवून मजुरांच्या हाताला काम मिळाले. गावात जलसिंचनाच्या माध्यमाने पाणी टंचाईवर मात केली. तलावातील गाळाचा उपसा केल्याने सिंचन क्षमतेत वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मोठी मदत झाली. तसेच गावातील रस्ते, कालवा दुरुस्ती, पाटचारीची कामे करण्यात आली. ग्रामपंचायतमार्फत शेतकºयांना शेतीविषयक उपयोगी माहिती दिली जात आहे.जनावरांचे गोठे, शेळी पालनासाठी गोठे बांधकामासाठी शासनाच्या योजनेतंर्गत निधी उपलब्ध करुन देण्यात आला. शेतकºयांना रासायनिक खताच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम समजावून सांगून सेंद्रीय व रासायनिक खताचा वापर करण्याचे आवाहन केले जात आहे. वळद ग्रामपंचायतच्या ध्येयवादी विकासात्मक पावलांची दखल घेत शासनाने स्मार्ट ग्रामसाठी ग्रामपंचायतला प्रोत्साहन दिले आहे. याच स्मार्ट ग्रामची दखल राष्ट्रीय पातळीवर समितीने घेतली आहे. या समितीची पाऊलवाट ग्रामपंचायतसाठी भाग्योदय ठरणार आहे. लोकसहभागातून विकासाची वाटचाल करणारे वळद हे गाव स्मार्ट ग्रामचे आदर्श मॉडेल ठरत आहे.
वळद ग्रामपंचायतची ‘स्मार्ट ग्राम’कडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 10:35 PM
ग्रामीण विकासात स्थानिक स्वराज्य संस्था राजकारणाच्या पलीकडे जाऊन विकासाची मुहूर्तमेढ रोवत आहे. लोकसहभागाच्या सकारात्मकतेमुळे स्वत:चे गाव स्वराज्य संकल्पनेतून ‘स्मार्ट गाव’ ठरू शकते. असे ध्येय वळद ग्रामपंचायतने बाळगले आहे.
ठळक मुद्देलोकसहभागाची दखल : नरेगा अंतर्गत विकास कामांना गती