कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : एखाद्या व्यक्तीवरील प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणून १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केला जातो. या दिवशी प्रेमी एकमेकांना गुलाबाचे फूल, ग्रिटींग किंवा गिफ्ट देऊन आपले प्रेम व्यक्त करीत हा दिवस साजरा करतात. मात्र ‘व्हॅलेंटाईन डे’लाही सोशल मिडियाचा फ टका बसत असल्याचे चित्र आहे. सध्या व्हॉट्सअॅप व अन्य साईट्सचा वापर प्रेमी आॅनलाईन गिफ्ट देवू लागले आहेत. यामुळे मात्र फूल व ग्रिटींग विक्रेता अडचणीत आले आहे.‘व्हॅलेंटाईन डे’ला पे्रमी एकमेकांसाठी गुलाबाचे फूल तसेच ग्रिटींग किंवा गिफ्ट देतात. या दिवशी अन्य काही नाही मात्र किमान गुलाबाचे लाल फूल तरी देण्याची परंपरा आहे. यामुळेच आपल्या प्रेमीला गुलाबाच लाल फूल देण्याची परंपरा चालत आली आहे.‘व्हॅलेंटाईन डे’ चे हे फॅड सध्या तरूण-तरूणींत जास्त दिसून येते.त्यातही शाळा-कॉलेजमधील तरूणाईला ‘व्हॅलेंटाईन डे’चे आकर्षण जास्त दिसून येते. तरूणाईत धूंद या वर्गातून एकमेकांसाठी हा उत्सवाचा दिवसच असतो. मागील कित्येक वर्षांपासून चालत आलेल्या या परंपरेला दाद देत फूल व ग्रिटींग-गिफ्ट विक्रेतेही ‘व्हॅलेंटाईंन डे’ बघत तयारी करून ठेवतात. मात्र बदलत्या काळानुसार आता ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्याची पद्धतही बदलत चालली असल्याचे दिसून येत आहे. आज सोशल मिडियाचा बोलबाला असून सर्वांच्याच हाती स्मार्टफोन आले आहेत.या स्मार्टफोनच्या माध्यमातून आता शुभेच्छा देण्याचे काम उरकले जात आहेत. शिवाय विविध प्रकारचे स्टिकर्सही व्हॉट्सअॅप व अन्य साईट्सवर उपलब्ध असल्याने सोशल मिडियाचा वापर करूनच असे दिवस साजरे केले जात आहेत. यामुळेच ‘व्हॅलेंटाईन डे’ ची के्रजही कमी झाल्याचे दिसत आहे. परिणामी एकेकाळी २५-३० रूपयांपर्यंत विकले जाणारे गुलाबाचे फूल आज कमी प्रमाणात विकले जात असल्याचे दिसले.विशेष म्हणजे, ‘व्हॅलेंटाईन डे’ असल्यामुळे शहरातील फूल विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात गुलाबाचे लाल फूल खरेदी करून आपल्या दुकानात सजवून ठेवल्याचे दिसले. मात्र बोटावर मोजण्या इतकेच फूल विकल्या गेल्याचे एका फूल विक्रेत्याने सांगीतले.सोशल मिडियाची मार ‘व्हॅलेंटाईन डे’ला लागल्याचे सांगत त्या फूल विक्रेत्याने पुढील वर्षी फूल खरेदी करण्याबाबत विचारच करावा लागणार अशी प्रतिक्रीयाही व्यक्त केली.ग्रिटींग देण्याची परंपराच विरलीकाही वर्षापूर्वी सोशल मिडियाचा बोलबाला नसताना ‘व्हॅलेंटाईन डे’, ‘फ्रेंडशिप डे’, जन्मदिवस, दिवाळी किंवा अन्य सण व विशेष दिवस ग्रिटींग भेट देऊन साजरे केले जात होते. मात्र सोशल मिडियामुळे आता ही परंपराच विरली आहे. आता मोबाईलने व्हॉट्सअॅप व फेसबूकवर शुभेच्छा संदेश किंवा आॅनलाईन ग्रिटींग टाकून सोपस्कर पार पाडले जात आहेत. या प्रकारामुळे मात्र ग्रिटींग देण्याची परंपराच नाहीशी होत आहे.बजरंगदलाने काढली रॅली‘व्हॅलेंटाईन डे’ हा भारतीय संस्कृतीचा भाग नसल्याचे सांगत पूर्वीपासूनच बजरंग दल याचा विरोध करीत आला आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करू नये तसेच कुणी प्रेमी जोडपे मिळाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना बोलावून त्यांना अद्दल घडविली जाणार असा पवित्रा बजरंग दल नेहमीच घेऊन राहते.यांतर्गत बजरंग दलने बुधवारी (दि.१३) शहरात रॅली काढून बजरंग दलने ‘व्हॅलेंटाईन डे’चा विरोधही दर्शविला.
‘व्हॅलेंटाईन डे’ला सोशल मिडियाची मार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 9:42 PM
एखाद्या व्यक्तीवरील प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणून १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केला जातो. या दिवशी प्रेमी एकमेकांना गुलाबाचे फूल, ग्रिटींग किंवा गिफ्ट देऊन आपले प्रेम व्यक्त करीत हा दिवस साजरा करतात. मात्र ‘व्हॅलेंटाईन डे’लाही सोशल मिडियाचा फ टका बसत असल्याचे चित्र आहे. सध्या व्हॉट्सअॅप व अन्य साईट्सचा वापर प्रेमी आॅनलाईन गिफ्ट देवू लागले आहेत. यामुळे मात्र फूल व ग्रिटींग विक्रेता अडचणीत आले आहे.
ठळक मुद्देआॅनलाईन गिफ्ट व शुभेच्छा : फुल व ग्रिटींग विके्रते अडचणीत