भारत देशात विविध सण-उत्सव साजरे केले जातात. धार्मिक बाबी व ऋतुबदल लक्षात घेऊन येथील प्रत्येक सण-उत्सव साजरे केले जातात. यापैकीच वसंतपंचमी हा एक सण आहे. वसंत पंचमीला देवी सरस्वतीचा जन्म झाल्याचे मानले जाते, त्यामुळे या दिवशी सरस्वतीचे पूजन केले जाते. वसंतपंचमी उत्सव येथील मेरिटोरियस पब्लिक स्कूलमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम शाळा संस्थापक मुकेश अग्रवाल व प्राचार्य तुषार येरपुडे यांनी देवी सरस्वतीच्या छायाचित्राचे पूजन व माल्यार्पण करून वंदना केली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. समूहगीत व नृत्य सादर करण्यात आले. भाषणातून वसंतपंचमी पर्वावर प्रकाश टाकला. कार्यक्रमासाठी शाळा संस्थापक मुकेश अग्रवाल, प्राचार्य येरपुडे, संगीत शिक्षक रत्नाकर व सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
मेरिटोरियस पब्लिक स्कूलमध्ये वसंतपंचमी उत्साहात ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 4:35 AM