लोकमत न्यूज नेटवरगोंदिया : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील लोकांकरिता व पहिलवान मारुती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ व राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ या दोन उपकंपन्यांमार्फत वडार व रामोशी समाजातील लोकांकरिता स्वयंरोजगाराच्या माध्यमातून कृषी संलग्न व्यवसाय, लघू उद्योग, वाहतूक क्षेत्रातील संबंधित व्यवसाय, तांत्रिक व्यवसाय, पारंपरिक व्यवसाय अथवा सेवा उद्योग सुरू करण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँक व महामंडळ यांच्या संयुक्त माध्यमातून वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना व गट कर्ज व्याज परतावा योजना सुरू आहे. त्याचा जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना लाभ घेता येणार आहे.
या आहेत कर्ज योजना
- वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना अंतर्गत जास्तीत जास्त १० लाखांपर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येतो.
- गट कर्ज व्याज परतावा योजना अंतर्गत ५० लाखांपर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येतो.
- बीज भांडवल कर्ज योजना अंतर्गत ५ लाखांपर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येतो.
- थेट कर्ज योजना अंतर्गत १ लाख रुपये बिनव्याजी कर्ज पुरवठा करण्यात येतो.
या आहेत अटी-शर्तीयोजनांमध्ये लाभार्थीला मुद्दल आणि व्याज बँकेत भरावे लागणार आहे. त्यानंतर महामंडळ व्याजाची रक्कम १२ टक्क्यांपर्यंत लाभार्थीच्या वैयक्तिक खात्यात जमा करत असते. या योजनेच्या सर्व मार्गदर्शक सूचना महामंडळाच्या www.vjnt.in या संकेत- स्थळावर उपलब्ध असून त्यावर बघता येतील.
येथे करा अर्जयोजनेच्या लाभ घेण्यासाठी संकेतस्थळा- वरील पोर्टलद्वारे ऑनलाइन प्रस्ताव सादर करावयाचा आहे. तसेच योजनेकरिता महा- मंडळाच्या कार्यालयात अर्ज उपलब्ध आहेत. अधिक माहितीकरिता महामं- डळाच्या कार्यालयात येऊन संपर्क साधता येईल. जास्तीत जास्त इच्छुक व्यक्ती व संस्थांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक शंकर कुमरे यांनी कळविले आहे.