भाज्यांचे दर ३० रूपयांवरच : भाव ऐकूनच फुटतो घाम गोंदिया : डाळीने डोळ््यात पाणी आणले असून ताटातून वरण गायब झाले आहे. त्यापाठोपाठ आता भाज्यांनाही महागाईचा तडका लागल्याने भाज्याही ताटातून गायब होताना दिसत आहे. आजघडीला बाजारात ३० रूपयांच्या आत एकही भाजी नाही. त्यामुळे भाज्यांचे भाव ऐकताच घाम फुटू लागला आहे. विशेष म्हणजे उन्हाळ््यात भाज्यांची आवकडही कमी होत असल्याने घ्यावे तरी काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. महागाईमुळे आज सर्वसामान्यांना जगणे कठीण झाले आहे. प्रत्येकच वस्तूंचे भाव गगनाला भिडल्याने काय घ्यावे व काय सोडावे असा प्रश्न सर्वांना भेडसावत आहे. यात दैनंदिना जीवनातल्या अन्य वस्तूवरील नाहक खर्च कमी करता येईल. मात्र जेवण सोडता येणार नाही. महागाईमुळे मात्र आता दोनच्या ऐवजी एकच वेळ जेवण करण्याची पाळी आली आहे. त्यात भाजीपालाही महागाईच्या या कचाट्यातून सुटलेला नाही. त्यामुळे आता जेवणाच्या ताटातून भाज्याही गायब होऊ लागल्या आहेत. चारही बाजूंनी सर्वसामान्यांची फसगत झाली आहे. काय खावे अशा प्रश्न पडू लागला आहे. आजघडीला भाज्यांचे दर ऐकताच धडकी भरू लागली आहे. कारण बाजारात ३० रूपयांच्या आत एकही भाजी दिसत नाही. पूर्वी खिशात पैसे घेऊन थैली भर भाजी येत होती, असे जुने लोक सांगतात. आता मात्र थैलीत पैसे घेऊन खिशात येणार एवढी भाजी मिळत आहे. (शहर प्रतिनिधी)
भाजीपाल्याला महागाईचा तडका
By admin | Published: April 08, 2016 1:37 AM