शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
3
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
4
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
5
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
6
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
7
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
8
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
9
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
12
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
13
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
17
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

स्कूलबसमधून विकला जातोय भाजीपाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 4:34 AM

गोंदिया : कोरोनाचा संसर्ग मागील दीड वर्षापासून सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच्या झळा सर्वसामान्यांना बसल्या आहेत. मात्र, ...

गोंदिया : कोरोनाचा संसर्ग मागील दीड वर्षापासून सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच्या झळा सर्वसामान्यांना बसल्या आहेत. मात्र, याचा सर्वांत मोठा फटका स्कूल बसमालक, चालकांना बसला आहे. आर्थिक परिस्थिती कोलमडल्याने त्यांचे कंबरडे मोडले आहे. गेल्या दीड वर्षापासून रोजगार नसल्याने कुटुंबाचा गाडा कसा हाकावा याच विवंचनेत स्कूल बसचालक, मालक आहेत. कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून शाळा, महाविद्यालये बंद असल्याने स्कूल बसमालक आणि विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या ऑटोचालकांना यांना आर्थिक फटका बसला. फेरीवाले, ऑटोरिक्षा चालकांना शासनाने मदत जाहीर केली. परंतु, स्कूल बसचालकांना अजूनही आर्थिक मदत जाहीर न केल्याने अनेक स्कूल बसचालक, मालकांवर उपासमारीची वेळ आली. नाइलाजास्तव अनेकांनी नियमित व्यवसाय सोडून पर्यायी व्यवसाय करण्यावर भर दिला. कुणी शेती कामाला तर कुणी रोजगार हमी योजनेच्या कामावर जाऊन आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. मागील दीड वर्षापासून जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये बंद असल्याने स्कूलबसची चाके थांबलेलीच आहेत. कोट्यवधी रुपयांचा फटका या व्यवसायाला बसला आहे.

...................

गोंदिया जिल्ह्यात एकूण स्कूल- १६०४

गोंदिया जिल्ह्यात ४१० स्कूलबस

...........................

गाडीवरील कर्ज कसे फेडणार?

स्कूलबस उभ्या असल्याने मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. कर्ज घेऊन स्कूल व्हॅन खरेदी केली. व्यवसाय सुरू केला. मात्र, कोरोनामुळे स्कूलबस जागीच उभी आहे. त्यामुळे बँकांचे हप्ते कसे फेडावेत, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

- राधेश्याम बहेकार, स्कूल व्हॅन मालक

.............

लॉकडाऊनमुळे स्कूलबस, व्हॅन व्यवसायावर मोठे संकट आले. मागील दीड वर्षापासून स्कूलबस जागच्या जागीच उभी असल्याने सर्वांवरच बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. त्यामुळे आम्ही हताश झालो आहोत.

- धर्मेंद्र हरिणखेडे, स्कूल बस मालक

........................

चालकांचेही झाले हाल

दीड वर्षापासून हाताला काम नाही. संस्था संचालकही वेतन कुठून देणार? या सर्व बाबीचा विचार करता पोट भरण्यासाठी शेतीकडे व मिळेल ते काम करण्याकडे लक्ष वळविले आहे. शाळा सुरू झाल्यावर पुन्हा आम्ही आमच्या कामाला लागू.

- योगेश गायधने, स्कूल बसचालक

..............

शासनाने लॉकडाऊनच्या काळात ऑटोचालकांचा विचार करून त्यांना मदत जाहीर केली तशी मदत आमच्यासारख्या स्कूल बसचालकांना करणे अपेक्षित होते. परंतु कामही सुरू नाही आणि शासनाची मदतही नाही त्यामुळे आमची आर्थिक स्थिती चांगली नाही.

- सदानंद गिरीपुंजे, स्कूल बसचालक

................................

असा होतोय स्कूलबसचा वापर

१) भाजीपाला विक्रीसाठी स्कूलबसचा वापर होऊ लागला आहे. वाहनात विविध प्रकारचा भाजीपाला टाकून शहरातील गल्लोगल्लीत फिरवून भाजी विक्री केली जाते.

२) शहराबरोबर आता ग्रामीण भागातही लहान मुलामुलींपासून तर वृद्धांपर्यंत सर्वांनाच वापरता येईल असे रेडिमेड कापड या स्कूलबसमधून विक्री केले जात आहे.

३) काहींनी स्कूलबसमधून कडधान्ये विक्री करण्याच्या धंदा सुरू केला आहे. चने, वटाणे, मूग, पोपट, तूरडाळ अशा कडधान्यांची विक्री केली जात आहे.