आॅनलाईन लोकमतपरसवाडा : तिरोडा तालुक्यातील परसवाडा येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने हा दवाखाना वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे.नवेझरी हे गाव १५ खेड्यांचे केंद्रबिंदू आहे. येथे आठवडी बाजार सुद्धा भरतो. येथे दहावर्षापूर्वी जनावरांचा बाजार भरत होता. परंतु दिवसेंदिवस शेतकºयाकडील जनावरे कमी होत गेले व बाजार बंद झाला. नवेझरी येथे पशुवैद्यकीय दवाखाना शासनातर्फे पशु निगा राखण्यासाठी उघडण्यात आला. दवाखाना ग्रामपंचायतच्या इमारतीमध्ये होता. त्यावेळी डॉक्टर सुद्धा असायचे. परंतु ग्रामंडळाने मागणी केल्यावर इथे नवीन सुसज्य अशा पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले. पाण्याची सोय, जनावरांना औषध देण्याकरिता कटरा, वीजेची सोय व औषध साठा उपलब्ध अगोदर असायचा.मात्र मागील १५ ते २० वर्षापासून या दवाखान्यात डॉक्टर किंवा एक कर्मचारी सुद्धा राहत नाही. नवीन इमारतीमध्ये संर्पूण बाजूने झाडे-झुडपे गवत व घाण पसरली आहे.या येथील पशुवैद्यकीय अधिकाºयाचे रिक्त पद भरण्याची मागणी गावकºयांनी अनेकदा केली. मात्र जिल्हा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. शेतकरी शेतीला जोडधंदा पशुपालन करतात. मागील दोन वर्षाच्या दुष्काळामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात जनावरे विकत घेऊन या परिसरात दुग्ध व्यवसाय केला. मात्र शेतकºयांच्या जनावराची निगा राखण्यसाठी या दवाखान्यात औषध नाही. त्यामुळे कित्येक जनावरे रोगापासून दगावली आहेत. याकरिता येथे डॉक्टराची व्यवस्था करण्याची मागणी आहे.
नवेझरी येथील पशुवैद्यकीय दवाखाना वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 9:59 PM
तिरोडा तालुक्यातील परसवाडा येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने हा दवाखाना वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे.
ठळक मुद्देपशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे पद २० वर्षांपासून रिक्त : पशुपालकांचे नुकसान