शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

विदर्भाचा बॅकलॉग ४८ टक्के

By admin | Published: January 13, 2015 11:01 PM

विदर्भाचा बॅकलॉग ३२ टक्क्यांवरून ४८ टक्क्यांवर जाऊन पोहोचला. त्यामुळे प्रत्येक स्थितीत विदर्भाचा बॅकलॉग, मागासपणाचा बळी ठरत आहे. मात्र शासन केवळ सर्व्हे आणि सर्वेच करीत आहे,

सावत्र वागणूक : सर्वोच्च न्यायालयाचे विधिज्ञ श्रीहरी अणे यांचा दावागोंदिया : विदर्भाचा बॅकलॉग ३२ टक्क्यांवरून ४८ टक्क्यांवर जाऊन पोहोचला. त्यामुळे प्रत्येक स्थितीत विदर्भाचा बॅकलॉग, मागासपणाचा बळी ठरत आहे. मात्र शासन केवळ सर्व्हे आणि सर्वेच करीत आहे, असा आरोप सर्वोच्च न्यायालयाचे विधिज्ञ व विदर्भवादी अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी केले.गणेशनगर येथील जे.एम. हायस्कूलच्या प्रांगणात नाग विदर्भ आंदोलन समितीच्या वतीने विदर्भाचा बॅकलॉग व विदर्भ का वेगळा व्हावा, या विषयावर अ‍ॅड. अणे यांचे खुले व्याख्यान झाले. ते पुढे म्हणाले, सन १९८४ मध्ये तत्कालिन शासनाने विदर्भाचा बॅकलॉग म्हणजे विकासाच्या दृष्टीने मागासलेपण समजण्यासाठी दांडेकर कमिटी तयार केली होती. या कमिटीने विदर्भाचा बॅकलॉग माहीत करून घेण्यासाठी सर्वे केले. तेव्हा महाराष्ट्रापेक्षा विदर्भाचा बॅकलॉग ३२ टक्के अधिक आहे. म्हणजे महाराष्ट्रापेक्षा विदर्भ ३२ टक्के मागासलेला असल्याचे उघड झाले. दांडेकर कमिटीने शासनाला अहवाल सादर केला. मात्र शासनाने आपल्याच कमिटीच्या सर्वेकडे दुर्लक्ष करीत तो मानन्यास नकार दिला. यानंतर हा अहवाल केंद्राला पाठविण्याची घोषणा करून १० वर्षांपर्यंत प्रलंबित ठेवले आणि आता पुन्हा एक कमिटी बनवून याबाबत सर्वे करण्यात आला. असे केवळ अहवालवर अहवाल सादर करून शासन केवळ चालढकल करीत असल्याचे ते म्हणाले.कार्यक्रमात उच्च न्यायालयाचे अ‍ॅड. मुकेश समर्थ, वरिष्ठ अ‍ॅड. नीरज खांदेवाले, अभियंता दिनेश नायडू, छैलबिहारी अग्रवाल, किशनसिंह बैैस, के.आर. शेंडे, रंजीत जसानी व रमेश ढोमणे प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमासाठी नाग विदर्भ आंदोलन समितीचे कार्यकर्ता दीपक डोहरे, सविता तुरकर, पूजा काळसर्पे, अ‍ॅड. योगेश अग्रवाल, दीपा काशिवार, लता मानकर, हामीद सिद्दिकी, प्रभात अग्रवाल, मीनाक्षी आगलावे, अ‍ॅड. पराग तिवारी, छेदी इमलाह यांनी सहकार्य केले. सव्वा तास चाललेल्या या व्याख्यानात उपस्थित शेकडो नागरिकांनी विदर्भाची खरी माहिती जाणून घेतली व वेगळ्या विदर्भाची इच्छा प्रदर्शित केली. (प्रतिनिधी)काय काय आहे विदर्भात?विदर्भात खनिज संपदा, विविध पिकांचे व विजेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. येथे राजधानीच्या दृष्टीने विधानभवन व उच्च न्यायालयासह सर्व व्यवस्था आहे. विदर्भाला केवळ १५०० मेगावॅट विद्युतची गरज असताना येथे ५५०० मेगावॅट अधिक वीज उत्पन्न होते. जर विदर्भ राज्य वेगळे झाले तर अडीच रूपये युनिटच्या दराने २४ तास वीज उपलब्ध होऊ शकेल. आज विदर्भाची सर्व वीज मुंबई व पुणे यासारख्या महानगरांत उद्योगांसाठी पुरविली जात आहे. जर विदर्भात उद्योगांची वाढ झाली तर येथील वीज येथेच राहील. या क्षेत्रातील बेरोजगारांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून दिले जाऊ शकेल. मध्य प्रदेशपासून वेगळे होऊन छत्तीसगडने जशी प्रगती केली, तशी प्रगती महाराष्ट्रपासून वेगळे झाल्यावर विदर्भाची होऊ शकेल.वेगळ्या विदर्भाची मागणी अपूर्णच...विदर्भ आंदोलनाची सुरूवात अकोला येथील पंजाबराव कृषी विद्यापीठाला घेऊन झाली. त्यावेळी महाराष्ट्राचे नेते अकोला येथील कृषी विद्यापीठाला आपल्या क्षेत्रात नेऊ इच्छित होते. हाच मुद्दा घेऊन पहिल्या वेळी विदर्भ आंदोलन होऊन त्यात तीन विद्यार्थी शहीद झाले व या घटनेने उग्ररूप धारण केले. यानंतर जांबुवंतराव धोटे यांनी विदर्भ वेगळा करण्यासाठी आंदोलन सुरू केले. पाहता-पाहता या आंदोलनाने उंची गाठली. परंतु विदर्भाच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या नेत्यांसमोर गुडघे टेकल्याने सदर आंदोलन फिके पडले व वेगळ्या विदर्भाची मागणी अपूर्णच राहिली.