लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पारदर्शकता, शिस्त, संस्कृतीची मूल्ये जोपासण्याची भाषा करणाऱ्या भाजपच्या एका आमदाराचा डान्स बारमध्ये बारबालासह डान्स करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच राजकीय गोटात मोठी खळबळ उडाली आहे.गोंदिया जिल्ह्यातील आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार संजय पुराम हे या व्हिडिओत ‘सलामे ईश्क मेरी जान जरा कबुल करलो...’ या गाण्यावर एका बारबालेसोबत नाचताना व तिच्यावर पैसे उधळताना दिसत आहेत. या व्हिडिओशी आपला काही संबंध नसून आपली बदनामी करण्याचा हा डाव आहे असे पुराम यांनी म्हटले असले तरी मागील चार पाच दिवसांपासून या व्हिडिओची जिल्हाभरात चर्चा होती. गुरुवारी काही व्हॉटसअॅप ग्रुपवर तो व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा व्हिडिओ जिल्ह्यातील काही कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींना पाठविल्यामुळे आ. पुराम चांगलेच अडचणीत सापडले आहेत.हा व्हिडिओ मुंबईतील एका डान्सबारमधील असल्याचे सांगण्यात येते. त्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या एखाद्या कार्यकर्त्याने त्यांचा निवडणुकीच्या तोंडावर पद्धतशीरपणे गेम केल्याची चर्चा आहे. मात्र जिल्ह्यातील एकाही नेत्याने या प्रकरणावर भाष्य केलेले नाही.विधानसभा निवडणुकीचे तिकिट वाटप जाहीर होताना हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने भाजपाश्रेष्ठी यासंदर्भात काय निर्णय घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले.गुन्हा दाखलदरम्यान आ. पुराम यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या अज्ञात लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांनी बनावट व्हिडिओ तयार करून आणि त्यात माझ्या चेहऱ्याचा वापर करून व्हिडिओ व्हायरल करुन माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र या व्हिडिओशी माझा तीळमात्रही संबंध नाही. आपली बदनामी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधात देवरी पोलीस स्टेशन येथे गुरूवारी रीतसर तक्रार केली असल्याचे आ. संजय पुराम यांनी शुक्रवारी देवरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
बारबालेसोबत नाचणाऱ्या गोंदियाच्या भाजप आमदाराचा व्हिडिओ व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 11:02 PM
गोंदिया जिल्ह्यातील भाजपच्या एका आमदाराचा डान्स बारमध्ये बारबालासह डान्स करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच राजकीय गोटात मोठी खळबळ उडाली आहे.
ठळक मुद्देनिवडणुकीच्या तोंडावर खळबळ चर्चेला उधाण, पक्षाच्या भूमिकेकडे लक्ष