शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

लाडकी बहीण, भाऊ अन् मोफत योजनांभोवती फिरतेय; निवडणूक महागाई, भ्रष्टाचारावर कुणीही बोलेना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 3:01 PM

Gondia : विधानसभा निवडणुकीत जनतेची बहुतांश मुद्दे गायब

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : लोकसभेला संविधानात बदल, आरक्षणाला धोका असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केल्याने महाराष्ट्रात महायुतीला फटका बसला होता. परंतु, विधानसभा निवडणुकीत मात्र लोकसभेतील बहुतांश मुद्दे गायब झाले आहेत. यावेळी लाडकी बहीण, लाडका भाऊ अन् लाडका शेतकरी या मुद्यांभोवतीच निवडणूक फिरत आहे. 

त्यात महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, शेतमालाला भाव या मुद्यांना मात्र सोयीस्करपणे बगल देण्यात येत असून एकमेकांवर वैयक्तिक चिखलफेकीमुळे मतदारांचे मात्र चांगलेच मनोरंजन होत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपकडून राममंदिर, कलम ३७०, रस्ते, मेट्रोचे जाळे या मुद्यांवर जोर दिला गेला होता. तसेच विरोधकांना देशद्रोही मंडळींचा समूह म्हणून हिणविले होते. तर इंडिया आघाडीकडून संविधानाला धोका महागाई, बेरोजगारी, आरक्षण संपविणार, उद्योगधंदे गुजरातला पळविले, मणिपूर या मुद्यांवर प्रचार करण्यात आला. त्यात संविधानाला धोका या मुद्यावर आघाडीने अधिक जोर दिल्याने महायुती बॅकफूटवर गेली होती.

विधानसभा निवडणुकीत यावेळी भाजपकडून लाडक्या बहिणींना दरमहा दीड हजार रुपयांऐवजी २१०० रुपये देणार, युवकांच्या हाताला काम, वृद्धांच्या पेन्शनमध्ये वाढ, महाराष्ट्रात गुंतवणूक वाढली, 'शेतकरी सन्मान'च्या निधीत वाढ, महिलांना एस.टी. प्रवासात सवलत, ओबीसी, एससी, एसटी आरक्षणाला धोका या मुद्यांवर प्रचारात जोर देण्यात येत आहे. महाविकास आघाडीनेही त्याला उत्तर म्हणून लाडक्या बहिणींना दरमहा तीन हजार रुपये देणार, जातनिहाय जनगणना, महिलांना मोफत प्रवास, भ्रष्टाचार, जाती-धर्मात तेढ, आरक्षण मर्यादा ५० टक्क्यांच्या पुढे नेणार हे मुद्दे घेऊन ते मतदारांमध्ये नेले आहेत. 

मुख्य मुद्द्यांवर कोणीच बोलेना महायुती व महाविकास आघाडीकडून मतदारांना आपल्याकडे खेऊन घेण्यासाठी नवनवे मुद्दे उकरून काढले जात आहे. परंतु, या सर्वांमध्ये वाढत असलेली महागाई, बेरोजगारी, भरती परीक्षांतील घोटाळे, शेतकरी आत्महत्या, आरोग्य व्यवस्था या कळीच्या विषयांना मात्र कुणीही हात घातला नाही. उलट, एकमेकांवर वैयक्तिक चिखलफेक करण्यातच धन्यता मानली जात आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४gondiya-acगोंदिया