शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
2
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
3
घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे
4
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
5
'मन की बात' मध्ये पंतप्रधान मोदींनी केला छोटा भीम, मोटू-पतलू अन् हनुमानाचा उल्लेख; काय म्हाले?
6
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
7
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
8
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
9
"काँग्रेसने १०० जागा लढवल्या तर आम्हाला...’’, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगिलतं
10
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
11
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
12
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
13
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
14
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
15
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
16
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
17
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
18
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
19
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
20
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 

संसद कार्यप्रणालीचे अवलोकन व विचारांचे आदान-प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 9:34 PM

राज्य विधानमंडळाच्या लोकलेखा समितीचा आठ दिवसीय विदेशदौरा यशस्वीरित्या आटोपला आहे. समितीचे अध्यक्ष गोपालदास अग्रवाल यांच्या नेतृत्वात आयोजीत या दौऱ्यात प्रतिनिधी मंडळाने ब्रिटेन-निदरलँड व फ्रांसचा दौरा करून ससंदीय कार्यप्रणालीचे अवलोकन केले.

ठळक मुद्देलोकलेखा समितीचा विदेशदौरा : फ्रान्स संसदेच्या दोन्ही सदनांना भेट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्य विधानमंडळाच्या लोकलेखा समितीचा आठ दिवसीय विदेशदौरा यशस्वीरित्या आटोपला आहे. समितीचे अध्यक्ष गोपालदास अग्रवाल यांच्या नेतृत्वात आयोजीत या दौऱ्यात प्रतिनिधी मंडळाने ब्रिटेन-निदरलँड व फ्रांसचा दौरा करून ससंदीय कार्यप्रणालीचे अवलोकन केले. तसेच तेथील लोकलेखा समितीची भेट घेऊन विचारांचे आदान-प्रदान करण्यात आले.या दौऱ्यातील पहिल्या टप्प्यात आमदार अग्रवाल व प्रतिनिधी मंडळाने ब्रिटेनची राजधानी लंडनमध्ये ब्रिटीश संसदेच्या ‘हाऊस आॅफ लॉर्ड्स व हाऊस आॅफ कॉमन्स’ या दोन्ही सदनांत उपस्थित राहून तेथील प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत संसदीय कार्यप्रणालीचे अवलोकन केले. तसेच ब्रिटीश लोकलेखा समितीचे अध्यक्ष व खासदार मेगहिलर यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत विविध महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करून त्यांना सन्मानीत केले होते.त्यानंतर प्रतिनिधी मंडळाने ब्रिटीश संसदच्या महत्वपूर्ण कॉमनवेल्थ पार्लियामेंट असेंबलीचे सभापती जेम्स पाँड व चार खासदारांसोबत बैठक करून अनेक विषयांचा आदान-प्रदान केला. सोबतच भारतीय दूतावासचे राजदूत यशवंत सिन्हा यांची भेट घेऊन त्यांना भारत व महाराष्ट्रातील वर्तमान परिस्थितींशी अवगत करविले.पश्चात, प्रतिनिधी मंडळाने नेदरलँड येथील संसद कार्यवाहीचे अवलोकन केले. तर ९ सप्टेंबर रोजी प्रतिनिधी मंडळाने फ्रांस येथे पोहचून फ्रांस अ‍ॅकेडमी व फ्रांसमध्ये निवासी भारतीय नागरिकांसोबत फ्रांसच्या दोन्ही संसदांचा दौरा केला व १२ तारखेला प्रतिनिधी मंडळ भारताला परतले.विशेष म्हणजे, महाराष्ट्र विधान मंडळात राज्य लोकलेखा समिती सहीत अन्य ३५ समित्यांचा समावेश आहे. मात्र ही पहिलीच वेळ आहे की, जेव्हा राचज्य विधानमंडळातील कोणती समिती विदेश दौऱ्यावर गेली.त्यातही, आमदार अग्रवाल यांनी त्यांच्या मागील व सध्याच्या विद्यमान कार्यकाळात कित्येक उल्लेखनीय कार्य केले आहेत. त्यात आता समितीच्या या दौऱ्याला अंत्यत महत्त्वपूर्ण सांगत या दौऱ्यामुळे भाविष्यात राज्यात अनेक यशस्वी परिणाम बघावयास मिळतील अशी प्रतिक्रीय आमदार अग्रवाल यांनी व्यक्त केली आहे.भारतीय राजदूत व फ्रान्स सभापतींचा केला सत्कारप्रतिनिधी मंडळाने फ्रान्स येथे पोहचून तेथील भारताचे राजदूत ए.के.बॅनर्जी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा करून प्रतिनिधी मंडळाने त्यांचा सत्कार केला. तसेच फ्रांसच्या दोन्ही संसदांचा दौरा करीत तेथील सभापतींची भेट घेऊन त्यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली व त्यांनाही प्रतिनिधी मंडळाकडून सन्मानीत करण्यात आले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल