अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. एन. डी. किरसान होते. याप्रसंगी डॉ. किरसान यांनी, विलासराव देशमुख हे लोकाभिमुख कल्याणकारी नेते होते. त्यांचा मृदू व नेहमी हसरा स्वभाव मन भेदून जात होता. लोककल्याणाच्या कोणत्याही बाबीसाठी त्यांनी कधीही नाही म्हटले नाही. महाराष्ट्राला सतत दोनवेळा लाभलेले ते मुख्यमंत्री होते. नंतर त्यांची निवड राज्यसभेवर झाली व केंद्र सरकारमध्येही केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी काम केले. महाराष्ट्राला लाभलेले ते एक दूरदृष्टीचे नेते होते. ज्यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात सरपंच पदापासून केली. ते नेहमीच आमच्या स्मरणात राहतील, असे प्रतिपादन किरसान यांनी केले. कार्यक्रमाला काँग्रेस प्रदेश सचिव विनोद जैन, अमर वराडे, काँग्रेस युवा नेते अशोक गुप्ता, जहिर अहमद, सूर्यप्रकाश भगत, परवेज बेंग, नीलम हलमारे, राजीव ठकरले, गंगाराम बावनकर, पप्पू पटले, पवन नागदवने, पंकज पिल्ले यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
विलासराव देशमुख हे एक कल्याणकारी लोकनेते ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 4:22 AM